SAKAL Impact : ..अखेर मळगाव येथे टँकर सुरू; ग्रामस्थांची भटकंती थांबल्याने दिलासा

SAKAL Impact : मळगाव (ता. भडगाव) येथे सध्या आठ ते नऊ दिवसांआड पिण्याच्या पाण्याचा जेमतेम पाणीपुरवठा होत होता.
Crowd of citizens and women to fill water on the tankers started by the government.
Crowd of citizens and women to fill water on the tankers started by the government.esakal

SAKAL Impact : मळगाव (ता. भडगाव) येथे सध्या आठ ते नऊ दिवसांआड पिण्याच्या पाण्याचा जेमतेम पाणीपुरवठा होत होता. पाझर तलाव व पाणीपुरवठा विहिरीही वाढत्या तापमानाने कोरडीठाक झाल्याने पाणीपुरवठ्यावर परिणाम झाल्याचे चित्र होते. मळगावकरांना घोटभर पाण्यासाठी भटकंती करावी लागत होती. याबाबत ‘सकाळ’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. अखेर प्रशासनाने मळगावला पाण्याचे टँकर सुरू करून पाणीटंचाई दूर केली आहे. ( tankers start at Malgaon )

मळगाव गावासाठी पाण्याचे टँकर सुरू करण्यात यावे. पिण्याच्या पाण्याचा मुख्य प्रश्न मार्गी लावावा, या मागणीचा प्रस्ताव मळगाव ग्रामपंचायतीमार्फत भडगाव पंचायत समितीला देण्यात आला होता. याबाबत बातमी ही प्रसिद्ध करण्यात आली होती. प्रशासनाने तत्काळ मागणीची दखल घेत एक मे महाराष्ट्र दिनी मळगाव गावासाठी पाण्याचे टँकर सुरू करण्यात आले आहे.

गावात टँकरचे आगमन होताच ग्रामपंचायतीच्या आजी-माजी पदाधिकारी, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे. या वेळी पाण्याच्या टँकरचे पूजन करण्यात आले. या वेळी टँकरवर पाणी भरण्यासाठी नागरिक, महिलांची मोठी गर्दी उसळली होती. नागरिकांनी आनंद व्यक्त केला. व प्रशासनाचे आभार मानले आहेत. गावात पाण्याचे टँकर सुरू झाल्यामुळे पिण्याच्या पाण्याची टंचाई दूर होण्यास दिलासा मिळाला आहे. (latest marathi news)

Crowd of citizens and women to fill water on the tankers started by the government.
SAKAL Impact : नांदीन, पिसोळबारी रस्त्याचे काम सुधारा; अधिकाऱ्यांकडून ठेकेदारास सूचना

या वेळी सरपंच शोभा रामकृष्ण पाटील, सदस्य रामकृष्ण मरसाळे, शैलेश मोरे, प्रताप परदेशी, माजी सदस्य बालू पाटील, श्‍याम चित्ते, अशोक परदेशी, नथ्थूदास बैरागी, मुरलीधर बैरागी, माजी सरपंच दमोताबाई चित्ते, महादू परदेशी, भाऊसाहेब पाटील, सुभाष मिस्तरी, सुरेश बैरागी, निर्मला परदेशी, विमलबाई राजपूत, शोभा परदेशी, ग्रामपंचायतीचे सेवक गणेश सोनार, सिंधू सैंदाणे यांच्यासह ग्रामस्थ, महिला, ग्रामपंचायतीचे आजी, माजी पदाधिकारी मोठ्या संख्येने हजर होते.

टँकर मंजूर कामी तहसीलदार विजय बनसोडे, गटविकास अधिकारी अन्सार शेख, चाळीसगाव तहसीलदार प्रशांत पाटील, लिपिक अधिकार निकम, भडगाव पाणीपुरवठा विभागाचे तांत्रिक अधिकारी वृषाली पवार, तहसीलचे लिपीक एम. एम. कोळी, मळगाव ग्रामसेवक रविराज पाटील आदींचे सहकार्य लाभले. तसेच बहाळ (ता. चाळीसगाव) येथील माजी उपसरपंच प्रमोद शिवराम पाटील यांची विहीर अधिग्रहीत करण्यात आली असून, त्यांचेही सहकार्य लाभले तर ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

टँकरच्या दररोज तीन फेऱ्या

टँकरचा गुरुवारी (ता. २) पहिलाच दिवस होता. बारा हजार ५०० लिटर क्षमतेचे टँकर असून, दररोज गावात तीन फेऱ्या मारणार आहेत. दरम्यान, गावात आठ ते नऊ दिवसांआड पाणी येत असल्याने ग्रामस्थांना रानोमाळ भटकंती करावी लागत होती. मात्र, आता गावात टँकर सुरू झाल्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला असून, भटकंत काहीअंशी थांबली आहे.

Crowd of citizens and women to fill water on the tankers started by the government.
SAKAL IMPACT : राज्यातील 2 लाख अंगणवाडी कर्मचाऱ्यांना थकीत मानधन अदा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com