SAKAL Impact : नांदीन, पिसोळबारी रस्त्याचे काम सुधारा; अधिकाऱ्यांकडून ठेकेदारास सूचना

SAKAL Impact : नांदीन (ता.बागलाण) येथील नांदीन ते पिसोळबारी रस्त्यावरील काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता.
Villagers with officials inspecting the road work here.
Villagers with officials inspecting the road work here.esakal

SAKAL Impact : नांदीन (ता.बागलाण) येथील नांदीन ते पिसोळबारी रस्त्यावरील काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याने स्थानिक नागरिकांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात होता. याबाबत 'सकाळ'ने (ता.२७) रोजी 'नांदीन, पिसोळबारी रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे' मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध होताच संबंधित यंत्रणा खडबडून जागी होत सदर रस्त्यावरील कामाची पाहणी केली व संबंधित ठेकेदारास कामात सुधारणा करण्याच्या सुचना दिल्या. (nashik Improvement of Pisolbari road work instructions marathi news)

बागलाण तालुक्यातील तसेच जिल्ह्याच्या शेवटच्या हद्दीतील नांदीन गावातील रस्त्याचे काम संबंधित ठेकेदारांकडून निकृष्ट होत असल्याची अनेक दिवसांपासून तक्रार होती. याबाबत संबंधित विभागाकडेही नागरिकांनी तक्रारीचा पाडा वाचला होता. याकडे मात्र अधिकाऱ्यांकडून दुर्लक्ष होत असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली जात होती.

कोट्यवधी रुपये खर्चून नव्यानेच सुरू असलेल्या रस्त्यावरील कामापेक्षा जुनाच खडतर प्रवास बरा होता अशी म्हणण्याची वेळ वाहनचालकांसह नागरिकांकडून भावना व्यक्त केली जात होती. याबाबत स्थानिक तरूणांनी लक्ष घालून चांगल्या स्थितीत रस्त्यावरील काम करावे अन्यथा उपोषणाचा इशारा दिला होता.  (latest marathi news)

Villagers with officials inspecting the road work here.
SAKAL Impact : अखेर फुटलेल्या ड्रेनेजलाइनची दुरुस्ती

याबाबत 'सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित विभाग खडबडून जागे होत अधिकाऱ्यांनी दखल घेतली व रस्त्यावरील कामाची पाहणी केली. तांत्रिक कारणास्तव रस्त्यावरील काम खराब झाल्यामुळेच गोंधळ उडाल्याने डांबर खडी उखडली जात असल्याचे सांगण्यात आले. या रस्त्यावर पसरलेली खडी उचकटून पुन्हा चांगल्या दर्जाचा रस्ता करण्याचे आदेश संबंधित विभागाकडून सदर ठेकेदारास देण्यात आले.

''नांदीन गावापासून ते पिसोळबारीपर्यंत रस्त्यावरील काम अतिशय खराब होत होते. आम्ही अनेक वेळा तक्रारी केल्या मात्र दाद मिळत नव्हती. 'सकाळ'ने वृत्त प्रसिद्ध करताच अधिकाऱ्यांनी दखल घेत कामाचा दर्जा सुधारला. याबद्दल 'सकाळ'चे आभार.''- मयुर नेरकर, सामाजिक कार्यकर्ते, नांदीन.

Villagers with officials inspecting the road work here.
SAKAL IMPACT News : कोंडी होणाऱ्या चौकांत धडक कारवाई! वाहतूक शाखेकडून सिटीलिंक बसचालकांनाही इशारा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com