जळगाव : शेतकऱ्यांना ‘हंगामी’ दिलासा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

farmer

जळगाव : शेतकऱ्यांना ‘हंगामी’ दिलासा

जळगाव (एरंडोल) : तालुक्यात यावर्षी सतत पडणाऱ्या पावसामुळे खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावार नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. तालुक्यातील सर्व ६५ गावांची हंगामी पैसेवारी पन्नासच्या आत असल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. खरीपाची अंतिम पैसेवारी सुद्धा पन्नासच्या आताच असावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे.

तालुक्यात यावर्षी सातत्याने पाऊस पडल्यामुळे कापूस, सोयाबीन, ज्वारी, बाजरी, मका यासह कडधान्य आणि अन्य खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. यावर्षी शेतकऱ्यांच्या दृष्टीने पांढरे सोने समजल्या जाणाऱ्या कापसाला चांगला भाव आहे. मात्र, उत्पादन कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना वाढीव दराचा लाभ मिळू शकला नाही. कापसावर अळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी दोन वेचणी झाल्यानंतर कपाशीवर नांगर फिरवला आहे. खरीप हंगामात फटका बसल्यानंतर शेतकरी वर्गाकडून रब्बीची तयारी केली जात आहे.

हेही वाचा: दिल्लीत लॉकडाऊनची तयारी, 'आप' सरकारची कोर्टात माहिती

तालुक्यातील सर्व ६५ गावांची हंगामी पैसेवारी पन्नासच्या आत असल्यामुळे शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. तालुक्यातील अंतिम पैसेवारी देखील पन्नासच्या आताच असावी, अशी मागणी शेतकरी वर्गाकडून केली जात आहे. तालुक्याची गावनिहाय हंगामी पैसेवारी पुढीलप्रमाणे : एरंडोल ४८, विखरण ४८, चोरटक्की ४८, पिंपळकोठा बुद्रुक ४८, पिंपळकोठा खुर्द ४९, पिंप्री बुद्रुक ४९, पिंप्री प्रा. चा. ४९, धारागीर ४८, खडके खुर्द ४८, खडकेसिम ४९, गणेशनगर ४९, भालगाव बुद्रुक ४८, नंदगाव बुद्रुक ४९, पातरखेडा ४८, टोळी खुर्द ४९, जवखेडा खुर्द ४८, जवखेडा बुद्रुक ४८,कासोदा ४७, आडगाव ४७, फरकांडे ४७, जानफळ ४७, मालखेडे बुद्रुक ४८, उमरे ४७, नांदखुर्द बुद्रुक ४७, जळू ४७, पळासदड ४९, हनुमंतखेडे बुद्रुक ४८, हनुमंतखेडे मजरे ४८, वनकोठे ४७, बांभोरी खुर्द ४९, सोनबर्डी ४८, उत्राण अहिरहद्द ४९, उत्राण गुजरहद्द ४९, तळई ४९, अंतुर्ली खुर्द ४९, निपाणे ४९, गालापूर ४८, मुगपाठ ४७, आनंदनगर ४८, जवखेडेसिम ४९, ताडे ४९, ब्राम्हणे ४८, हनुमंतखेडेसिम ४९, भातखेडे ४९, पिंप्रीसिम ४९, रिंगणगाव ४७, पिंपळकोठा प्र.चा.४८, वैजनाथ ४७, टाकरखेडा ४८, उमरदे ४८, खडकेबुद्रुक ४७, खेअगाव ४७, कढोली ४८, खेडीखुर्द ४८.

loading image
go to top