Jalgaon News : बस बंद केल्याने प्रवाशांचे हाल! पारोळ्यासह अमळनेरला तालुक्यातील प्रवाशांची मोठी गैरसोय

Jalgaon : तालुक्यातील खेडीढोक येथे अमळनेर आगारातून सुटणारी सकाळची नऊ वाजेची बस खेडीढोक मार्गे अमळनेर बस आगाराच्या प्रशासनाने कोणतेही कारण न देता अचानक बस बंद केली आहे.
Plight of passengers due to closure of village bus
Plight of passengers due to closure of village busesakal

Jalgaon News : तालुक्यातील खेडीढोक येथे अमळनेर आगारातून सुटणारी सकाळची नऊ वाजेची बस खेडीढोक मार्गे अमळनेर बस आगाराच्या प्रशासनाने कोणतेही कारण न देता अचानक बस बंद केली आहे. त्यामुळे शिक्षणासह बाजार कामधंद्यासाठी पारोळा व अमळनेर येथे जाणाऱ्या-येणाऱ्या महिला व ज्येष्ठ नागरिकांची मोठी गैरसोयच झालेली आहे. ( ST passenger in Parola and Amalner taluka are in big trouble )

अनेक वर्षांपासून सकाळी लवकर पारोळ्याला जाण्यासाठी आणि पून्हा सायंकाळी पारोळ्याहून सुटत असल्याने पारोळा व अमळनेर या दोन्ही तालुक्यांतील दिवसभराचे कामकाज आटोपून घरी जाण्यासाठी ही बस सोयीची होती. खेडीढोक गाव हे गाव पारोळा, अमळनेर व धरणगाव या तिन्ही तालुक्यांपासून १५ किलोमीटर अंतरावर असल्याने खेडीढोक गावात येण्या व जाण्यासाठी फाट्यापासून तीन किलोमीटरचा पायी प्रवास करावा लागतो. फाट्यापासून खासगी वाहन येत नसल्याने सणासुदीत व कडक उन्हात पायपीट करावी लागते.

अमळनेर आगाराने यापूर्वीही ही बस बंद केली होती. परंतु, माजी आमदार साहेबराव पाटील यांनी व ग्रामस्थांच्या प्रयत्नाने पुन्हा सुरू केली होती. आता बस सुरू करण्यासाठी फोन केला, तर उडवाउडवीची उत्तरे दिली जातात, असे प्रवाशांचे म्हणणे आहे. अमळनेर आगाराने ही बस सुरू करावी यासाठी खेडीढोक येथील ग्रामस्थांनी आगारप्रमुखांना निवेदन दिले आहे. निवेदनाची दखल न घेतल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांसह प्रवाशांनी दिला आहे. (latest marathi news)

Plight of passengers due to closure of village bus
Jalgaon Cotton News : एकीकडे लागवड, दुसरीकडे कापूस विक्री; उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत

''खेडीढोक हे गाव वाळवंटातील आदिवासी पाड्यासारखे वाटू लागले आहे. या गावात नवीन येणाऱ्या जाणाऱ्या पाहुण्यांनी विचारले की, बस कितीवा आहे, तर त्यांना नाईलाजाने सांगावं लागते की, बस बंद आहे.''- बाळू पाटील, माजी उपसरपंच, खेडीढोक.

''खेडीढोक गावची बस बंद झाल्याने बाजार करण्यासाठी पारोळा शहराच्या ठिकाणी जाण्यासाठी मोहाडी तीन किलोमीटर फाट्यावर कडक उन्हात पायी चालून बसने प्रवास करावा लागतो. परिवहन महामंडळाने ज्येष्ठ नागरिकांचा विचार करता नियमित बस सुरू करावी.''- तुकाराम वैराळे, ज्येष्ठ नागरिक, खेडीढोक (ता. पारोळा)

''कामानिमित्त नेहमी पारोळ्याला जावे लागते. माझी पत्नीदेखील दिव्यांग आहे. बसने प्रवास सुरक्षित असतो, म्हणून याबाबत विचार करून बस नियमित सुरू करावी.''-सुखदेव पाटील, दिव्यांग, खेडीढोक.

''सध्या हंगाम सुरू झालेला आहे. त्यामुळे बसफेऱ्यांची अडचणी येत होती. ग्रामस्थांच्या मागणीनुसार दोन ते तीन दिवसांत एक बसफेरी सुरू करण्यात येईल.''- इमराण पठाण, आगारप्रमुख, अमळनेर.

Plight of passengers due to closure of village bus
Jalgaon News : चिनावल येथील परिस्थिती नियंत्रणात! पुढील 2 दिवस संचारबंदी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com