Jalgaon Unseasonal Rain Damage : नांद्रा परिसरात वादळाचा तडाखा; कापणी झालेल्या गहू, दादर, हरभऱ्याचे नुकसान

Jalgaon Unseasonal Rain Damage : परिसरात शुक्रवारी (ता. १) दुपारी तीनच्या सुमारास तब्बल दोन तास अवकाळी पावसासह वादळीवाऱ्याचा जोरदार तडाखा बसला.
Damage to wires on power poles due to falling trees.
Damage to wires on power poles due to falling trees.esakal

Jalgaon Unseasonal Rain Damage : परिसरात शुक्रवारी (ता. १) दुपारी तीनच्या सुमारास तब्बल दोन तास अवकाळी पावसासह वादळीवाऱ्याचा जोरदार तडाखा बसला. यामुळे ज्वारी, गहू, हरभरा, दादर पिकांचे मोठे नुकसान झाले. कापणी झालेल्या दादर, ज्वारी, बाजरी, गहू, हरभऱ्याचे आजच्या पावसामुळे नुकसान झाले.

वादळामुळे वरसाडे, डोकलखेडा, दहिगाव परिसरात जोराचे वादळ आल्याने अनेक झाडांची पडझड झाली. काही झाडे वीजखांबांवरच पडल्याने तारांचे मोठे नुकसान झाले. (Jalgaon Storm hits Nandra area Loss of harvested wheat gram)

Damage to wires on power poles due to falling trees.
Jalgaon Municipality News : महापालिकेची शीतल कनेक्शनला नोटीस; सोमवारी तळघरात बांधकाम तोडण्याची कारवाई

ज्यामुळे अनेक भागातील वीजपुरवठा खंडित झाला होता. या संकटामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी अस्वस्थ झाले आहेत. काही वेळ वादळाचा तडाखा इतका जोरात होता, की उभे असलेली रब्बीचे पिके अक्षरशः जमीनदोस्त झाली.

परिसरातील बांबरुड (राणीचे), सामनेर, नांद्रा, लासगाव, कुरंगी, माहेजी, दुसखेडा, वरसाडे, डोकलखेडा, दहिगाव, पहाण, हडसन वडगाव, खेडगाव, गोराडखेडा येथील शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांना वादळाचा मोठ्या प्रमाणावर फटका बसला. वरसाडे, दहिगाव, डोकलखेडा परिसरात वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे ग्रामस्थांचे खूपच हाल झाले. (latest marathi news)

Damage to wires on power poles due to falling trees.
Jalgaon Unseasonal Rain Damage : मेहुणबारे परिसरात शुक्रवारी पुन्हा नुकसानीचा फटका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com