जळगाव : एक हजार जणांना भटक्या कुत्र्यांचा चावा

भटक्या कुत्र्यांचा त्रास; सर्वाधिक चावा घेतलेले रुग्ण जळगाव शहरातील
Stray dog
Stray dogsakal

जळगाव : येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या इंजेक्शन विभागामध्ये मार्च व एप्रिल या दोन महिन्यात एकूण १ हजार ७२ व्यक्तींनी विविध प्राण्यांनी चावा घेतला यासाठी इंजेक्शन घेतले आहे. पैकी, १ हजार ४१ नागरिकांनी कुत्रे चावल्यामुळे विभागातून इंजेक्शन व उपचार घेतले आहे. यातील सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील असल्याची माहिती आहे.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात ओपीडी काळात इंजेक्शन विभागात (१०५) विविध प्राण्याच्या चाव्यावर प्रतिबंधात्मक इंजेक्शन घ्यायला नागरिक येत असतात. जिल्हाभरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ वाढला आहे. या विभागामध्ये मार्च महिन्यात एकूण ५०४ व्यक्तींना कुत्रा चावल्यामुळे उपचार करण्यात आले आहे. यात ३२६ पुरुष, ९१ महिला तर ८७ लहान बालकांचा समावेश आहे. उपचार घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील आहेत. तसेच महिन्याभरात ८ रुग्णांना मांजर, ५ जणांना उंदीर, ४ जणांना मानवी चावा घेतल्यामुळे उपचार करण्यात आले.

एप्रिलमध्ये एकूण ५३७ व्यक्तींना कुत्रा चावल्यामुळे उपचार करण्यात आले आहे. यात ३४८ पुरुष, ८७ महिला तर १०२ लहान बालकांचा समावेश आहे. उपचार घेणाऱ्यांमध्ये सर्वाधिक रुग्ण जळगाव शहरातील आहेत. महिन्याभरात ११ रुग्णांना मांजर, २ महिलांना उंदीर, एकाला खारीने चावा घेतल्यामुळे उपचार करण्यात आले.

अशी घ्या काळजी

नागरिकांनी त्यांच्यासह लहान मुलांना भटक्या व पाळीव प्राण्यांपासून लांब ठेवावे. प्राणी चावल्यास तत्काळ रुग्णालयात उपचारासाठी यावे. कुत्रा चावल्यावर जखम झाकू नका, जखम उघडीच ठेवा. स्वच्छ व भरपूर पाण्याने जखम धुऊन घ्या, त्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी यावे. सकाळी ओपीडी विभागात खोली क्रमांक १०५ मध्ये तर दुपारी आपत्कालीन विभागाला कक्ष क्र. सी एकमध्ये भेट द्यावी, असे आवाहन वैद्यकीय अधीक्षक डॉ.विजय गायकवाड यांनी केले आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com