मुंबईत हत्या करून फरार झालेल्या जळगावच्या संशयितांना अटक

यापैकी एक संशयित जिल्हा कारागृहातून जामिनावर सुटला आहे.
Suspect Arrested latest crime news
Suspect Arrested latest crime newsesakal
Updated on

जळगाव : ठाणे-मुंबईत गावठी पिस्तुलातून डोक्यात गोळी झाडत खून करून फरार संशयितांना जळगाव एलसीबी, ठाणे व शहापूर पोलिसांच्या संयुक्त पथकाने जळगावातून अटक केली. विशेष म्हणजे यापैकी एक संशयित शनिवारी (ता. २) गावठी पिस्तूल बाळगल्याच्या गुन्ह्यात जिल्हा कारागृहातून जामिनावर सुटला आहे. जामिन मिळताच गुन्हे शाखेने त्याच्यावर प्रतिबंधात्मक कारवाईसाठी ताब्यात घेतल्यावर खुनाचा उलगडा झाला. (Latest crime news)

Suspect Arrested latest crime news
एखाद्या वरिष्ठ अधिकाऱ्याप्रमाणे चोरटा सांगतोय त्याचे कार्यक्षेत्र...

जळगाव हरीविठ्ठलनगरातील प्रवीण विनोद शिंदे आणि सागर मराठे मुंबईत साकीनाका येथील हॉटेल कोकण किनारा येथे कामाला होते. हॉटेल मालक संदीप सरवणकर आणि प्रफुल्ल पवार या दोघांच्या भागीदारीत हे हॉटेल सुरु होते. प्रफुल्ल पवार (रा. बांद्रा पश्चिम, मुंबई) आणि संदीप सरवणकर यांच्यात आर्थिक व्यवहारातून वाद सुरु होता. प्रफुल्ल याने संदीपकडे पैशांसाठी तगादा लावलेला होता. वाद विकोपाला गेल्याने संदीप सरवणकरने त्याच्या हॉटेलमध्ये काम करणाऱ्या प्रवीण शिंदे याला हत्येची सुपारी दिली होती. प्रवीण शिंदे व सागर मराठे अशा दोघांनी हत्येचा प्लॅन आखून १ जुलै रोजी प्रफुल्ल पवार याला त्याच्याच स्कॉर्पियो गाडीतून नेऊन गावठी पिस्तुलाने डोक्यात गोळी झाडून हत्या केली. हत्येनंतर संदीप सरवणकर, प्रवीण शिंदे, सागर मराठे अशांनी प्रफुल्ल पवार याच्या मृतदेहासह त्याची गाडी शहापूर (जि. ठाणे) येथे निर्जनस्थळी बेवारस सोडून पळ काढला होता. बेवारस उभ्या स्कॉर्पिओ मधून वास येत असल्याने शहापूर पोलिस रविवारी (ता. ३) घटनास्थळी दाखल झाले. गाडीतून मृतदेह निघाल्यावर हत्येचा उलगडा झाला.

Suspect Arrested latest crime news
साहेब, शूटिंग चालू आहे, पावती फाडा; टोइंग कर्मचाऱ्यांचा इशारावजा संदेश

हॉटेल मालकावर संशय

मृतदेहाची ओळख पटल्यावर प्रफुल्ल पवार याचा भागीदार संदीप सरवणकर याच्यावर संशय बळावला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची धुंडाळणी करत, मोबाईल कॉल रेकॉर्ड आणि टॉवर लोकेशन घेत असताना मयत प्रफुल्ल यांचे शेवटचे बोलणे संदीप सोबत झाले होते. अखेर पोलिस त्याच्या घरी धडकले मात्र, तो फरार होता. पोलिसांचा संशय ठोस हेाऊन संदीपला ताब्यात घेण्यात आले.

Suspect Arrested latest crime news
Army मध्ये नोकरीच्या आमिषाने घालायचा लाखोंचा गंडा; भामटा गजाआड

अन्‌ पोलिस जळगावला धडकले

तांत्रिक माहितीच्या आधारे ठाणे पोलिसांचे पथक जळगावच्या दिशेने रवाना झाले. तत्पूर्वीच हरीविठ्ठलनगरातील धनगरवाड्यातून विनापरवाना गावठी पिस्तुलासह प्रवीण शिंदे (वय २१) याला अटक झाली होती. या गुन्ह्यात बुधवारी (ता. ६) प्रवीणला जामीन मिळाला. तो कारागृहातून बाहेर येताच त्याला एसीबीच्या पथकातील विजय पाटील, प्रीतम पाटील, पंकज शिंदे, सचिन महाजन यांच्या पथकाने ताब्यात घेतले. याचवेळी निरीक्षक किरणकुमार बकाले यांना संशयित मुंबईत खून करून पळाल्याची गुप्त माहिती मिळाली होती. त्याची चौकशी सुरु असतानाच ठाणे पोलिस जळगावात दाखल झाले. पोलिसांच्या चौकशीत प्रवीण शिंदे याने खुनाची कबुली देत घटनाक्रम सांगितला. त्याचा साथीदार सागर मराठे याला त्याच्या राहत्या घरातून पोलिसांनी ताब्यात घेतले. संशयितांना घेवुन पोलिस मुंबईच्या दिशेने रवाना झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com