SAKAL Exclusive : तळोदा- बऱ्हाणपूर चौपदरी मार्गात अखेर रावेरचा 'घात'

Jalgaon : अखेर तळोदा- बऱ्हाणपूर हा नियोजित राष्ट्रीय चौपदरी महामार्ग रावेर शहराजवळून व तालुक्याच्या पूर्व भागातून न जाता तो मुक्ताईनगर तालुक्यातूनच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
National Highway (file photo)
National Highway (file photo)esakal

Jalgaon News : अखेर तळोदा- बऱ्हाणपूर हा नियोजित राष्ट्रीय चौपदरी महामार्ग रावेर शहराजवळून व तालुक्याच्या पूर्व भागातून न जाता तो मुक्ताईनगर तालुक्यातूनच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भारतीय राजपत्रामध्ये सडक परिवहन व राजमार्ग मंत्रालयाने याबाबत प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत ही बाब स्पष्ट झाली आहे.

यामुळे खासदार रक्षा खडसे यांनी हा राष्ट्रीय महामार्ग रावेर शहराजवळून व पूर्व भागातून नेण्याचे केलेले प्रयत्न अयशस्वी ठरले आहेत. यामुळे तालुक्याच्या पूर्व भागाचा विकास खुंटणार असून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे. (Jalgaon Taloda Burhanpur planned national four lane highway will pass through Muktainagar taluka instead of passing near Raver city)

राजपत्रात उल्लेख

या विभागाचे उपसचिव अभय जैन यांनी नुकतेच हे राजपत्र प्रसिद्ध केले आहे. त्यानुसार निझर (गुजरात) ते बऱ्हाणपूर (मध्य प्रदेश) या एकूण २४० किलोमीटरच्या या नियोजित राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण आणि चौपदरीकरण करणे अपेक्षित आहे. यात निझरसह तळोदा, शहादा, शिरपूर, अमळनेर, फैजपूर, भुसावळ आणि बऱ्हाणपूर या उपविभागीय कार्यालयाच्या अखत्यारीतील महसुली जमीन संपादित करावी लागणार आहे.

त्या त्या भागातील उपविभागीय अधिकाऱ्यांना तसे अधिकार देण्यात आल्याचे या राजपत्रात म्हटले आहे. या महामार्गात चोपडा तालुक्यातील २४, यावल व रावेर तालुक्यातील प्रत्येकी २३, मुक्ताईनगर ५ आणि बऱ्हाणपूर तालुक्यातील ३ गावांमधील जमीन शासनाला नव्याने संपादित करावी लागणार आहे.

खासदार खडसेंचे आश्वासन फोल

हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग रावेर शहराजवळून आणि तालुक्याच्या पूर्व भागातूनच जाईल असे मी स्टॅम्पवर लिहून देते असे सांगणाऱ्या खासदार रक्षा खडसे यांचे आश्वासन फोल झाल्याचे दिसून आले आहे.

या गावांतून जाणार

नियोजित राष्ट्रीय महामार्ग रावेर तालुक्यातील नांदूरखेडा, अजंदा, भोकरी, बोरखेडा, थेरोळा, धुरखेडा, निंभोरासीम, रोझोदा, चिनावल, वडगाव, विवरा बुद्रुक, विवरा खुर्द, निंभोरा बुद्रुक, कोचुर खुर्द, बोरखेडा सीम, कोचुर बुद्रुक, निंबोल, सांगवे, विटवे, रेंभोटा, वाघोदा खुर्द आणि वाघोदा बुद्रुक या गावांच्या शेती शिवारातून जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. (latest marathi news)

National Highway (file photo)
Jalgaon News : प्रेमविवाहापूर्वीच युवक, युवती ताब्यात; मेहुणबारे पोलिसांकडून समुपदेशन

यामुळे तेथील जमीन आता प्रशासनाला संपादित करावी लागणार आहे. हा राष्ट्रीय महामार्ग रावेर शहराजवळून तालुक्याच्या पूर्व भागातून बऱ्हाणपूरकडे जावा यासाठी रावेर येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले होते.

तर हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातून व अंतुर्ली भागातून जाण्यामुळे तेथील शेतजमीन नव्याने संपादित करावे लागणार आहे याला तेथील शेतकऱ्यांनी विरोध नोंदवला होता व त्यासाठी तिथे रस्ता रोको आंदोलन तिथेही करण्यात आले होते. मात्र या दोन्हीही आंदोलनांना प्रशासनाने वाटाण्याच्या अक्षदा लावल्याचे सिद्ध झाले आहे.

खासदार खडसे यांनी हा नियोजित राष्ट्रीय महामार्ग रावेर शहरात जवळून व पूर्व भागातूनच जावा यासाठी केंद्रीय सडक परिवहन व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी यांचीही भेट घेतली होती. मात्र पूर्वीच्या नियोजनाप्रमाणेच हा महामार्ग मुक्ताईनगर तालुक्यातूनच जाणार असल्याने रावेर शहराच्या व पूर्व भागाच्या विकासाची गती खुंटणार आहे.

National Highway (file photo)
Jalgaon News : शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार आज ठरणार; जळगाव लोकसभा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com