Temperature Rise : जळगावचा पारा 45 च्या घरात...! तालुक्यांमध्येही उष्णतेची लाट

jalgaon temperature rises to 45 degree celsius jalgaon news
jalgaon temperature rises to 45 degree celsius jalgaon newsesakal

Jalgaon News : गेल्या तीन-चार दिवसांपासून तापत असलेल्या जळगावचा पारा गुरुवारी सलग दुसऱ्या दिवशी पंचेचाळिशीच्या घरात पोचला. (jalgaon temperature rises to 45 degree celsius jalgaon news)

गुरुवारी शासकीय हवामान केंद्रावर जळगावचे तापमान ४४.८ अंश नोंदले गेले. अन्य तालुक्यांमध्येही उष्णतेची लाट असल्याचे चित्र दिसून आले.

एप्रिल महिना अवकाळी पावसात गेल्यामुळे यंदा एप्रिल ‘हॉट’ ठरला नाही. मे महिन्याचा पहिला आठवडाही दिलासादायक होता. मात्र, सोमवारपासून तापमान वाढीचा अनुभव येऊ लागला. बुधवारी देशभरात सर्वाधिक कमाल तापमान जळगावचे नोंदले गेले.

पाठोपाठ गुरुवारीही जळगावच्या कमाल तापमानाचा आकडा ४४.८ अंशांवर गेला. दिवसभर उष्णतेच्या लाटेचा अनुभव जळगावकरांनी घेतला. दुपारी अकरापासून सायंकाळी पाचपर्यंत प्रचंड तापमान होते. दुपारी १ ते ४ च्या सुमारास वाढत्या तापमानाने रस्ते निर्मनुष्य झाले होते. जळगाव जिल्ह्यातील स्थिती यापेक्षा वेगळी नव्हती.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

jalgaon temperature rises to 45 degree celsius jalgaon news
Jalgaon News : उमेदवारांनो, वर्षभरानंतर सादर करा जात प्रमाणपत्र; राज्यपालांचे निर्देश

वेलनेस वेदरने घेतलेली कमाल तापमानाची नोंद

जळगाव : ४४, भुसावळ : ४४

अमळनेर : ४३, बोदवड : ४३

भडगाव : ४४ , चोपडा : ४५

चाळीसगाव : ४३, धरणगाव : ४४

एरंडोल : ४४, फैजपूर : ४४

जामनेर : ४४, मुक्ताईनगर : ४४

पारोळा : ४४, पाचोरा : ४४

रावेर : ४४ , यावल : ४४

jalgaon temperature rises to 45 degree celsius jalgaon news
Jalgaon Summer : जळगाव शहर तप्त उन्हाच्या लाटेत...! तापमानाची वाटचाल 45 अंशाकडे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com