

Eknath Khadse House Robbery
House Robbery: राष्ट्रवादी शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या जळगावमधील बंगल्यात चोरी झाल्याची घटना घडलीय. जळगाव शहरात शिवराम नगर भागात मुक्ताई नावाचा त्यांचा बंगला आहे. या बंगल्यात चोरट्यांनी डल्ला मारत ६ ते ७ तोळे सोने आणि ३५ हजारांची रोकड लंपास केली असल्याची माहिती समोर आलीय. या प्रकरणी पोलिसात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास केला जात आहेत.