Jalgaon News : कापसू उत्पादक शेतकरी तोट्यात; क्विंटलमागे सुमारे पस्तीशेचा तोटा

Jalgaon : जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात (खरीप २०२३) कापसाच्या उत्पादनात मोठी घट आली, सोबतच खर्चातही वाढ झाली आहे. कापसाचा सरासरी उत्पादन खर्च प्रति एकरी २० ते २५ हजार रुपये आला.
cotton
cottonesakal

Jalgaon News : जिल्ह्यात गेल्या खरीप हंगामात (खरीप २०२३) कापसाच्या उत्पादनात मोठी घट आली, सोबतच खर्चातही वाढ झाली आहे. कापसाचा सरासरी उत्पादन खर्च प्रति एकरी २० ते २५ हजार रुपये आला. कापसाचे दर मात्र साडेसहा हजार ते सात हजार रूपया दरम्यान मिळाला. शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २ हजार ४०० ते ३ हजार ५०० रुपये नुकसान सहन करावे लागले आहे. (Jalgaon this year Cotton crop farmers in loss due to less production in district marathi news)

नुकसान होत असतानाही शेतकऱ्यांनी पीकपद्धतीत बदल न करता यंदा कापसाचा पेरा कायम ठेवण्याची भूमिका घेतली आहे. खानदेशात गेल्या हंगामात साडेपाच ते सहा लाख लाख हेक्टरवर कापसाची पेरणी होती. या भागातील भौगोलिक परिस्थिती व नैसर्गिक वातावरण कापसाच्या उत्पादनासाठी अनुकूल असल्याने खरिपात शेतकरी कापसाच्या पेरणीस प्राधान्य देतात. मात्र तीन वर्षांपासून कापसाच्या उत्पादनाच्या सरासरीचा आलेख घसरला आहे.

कोरोना काळात कापसाला मिळालेला उच्चांकी दर १३ हजार मिळाला होता. त्यानंतर दोन हंगामात कापसाला उच्चांकी दर मिळालेले नाहीत. आधारभूत दरांच्या तुलनेत ते अपेक्षेनुरूप कमीच राहिले. त्यामुळे शेतकऱ्याच्या नशिबी निराशाच आली. आता हंगाम संपुष्टात आला असला तरी घरी साठवून ठेवलेला कापूस बाजारात येत असून त्यास ६ हजार ५०० ते ७ हजार ०२० रुपये भाव मिळत आहे. (latest marathi news)

cotton
Jalgaon News : पाण्याच्या शोधात बिबट्याचा छावा विहिरीत; वनविभागाचे शर्थीचे प्रयत्न

यंदाही तीच स्थिती

सद्या हंगाम संपुष्टात आला असताना बाजारात कापसाला सरासरी सहा हजार पाचशे रुपये दर मिळत आहे. हमीदराच्या तुलनेत नफा तोट्याचा विचार केल्यास कोरडवाहू उत्पादकांना प्रतिक्विंटल ३५०० रुपये तर, ओलीताखालील शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल किमान २ हजार ४०० रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे.

घटते उत्पादन

गेल्या हंगामात पावसाचा खंड, गुलाबी बोंडअळीसह अन्य किडींचा प्रादुर्भावास परतीचा व अवकाळी पाऊस आणि प्रतिकूल हवामान यामुळे कापसाचे उत्पादन घटले आहे. पीक वाचविण्यासाठी करण्यात आलेल्या खर्चामुळे कापसाच्या उत्पादन खर्चात मोठी वाढ झाली.

''कपाशी हे नगदी पीक आहे. यामुळे शेतकरी कपाशीचा पेरा करतात. दरवर्षी कापसीच्या उत्पादनात घट होते. अवकाळी, अतिवृष्टीचा सामना करावा लागतो. कापसाला दरही मिळत नाही. मात्र दुसरे नगदी पीक कोणते असा प्रश्‍न आहे. पर्यायी पीक मुग, तूर आहे. मात्र पावसाने दगा दिल्यास ती पिकेही येत नाही, किंवा नुकसान तरी होते. कापसाला किमान दहा हजारांचा दर मिळाला पाहिजे. तरच शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च भरून निघेल.''- खेमचंद्र महाजन, असोदा

cotton
Jalgaon News : वन्य प्राण्यांसाठी कृत्रिम पाणवठे ठरताहेत संजीवनी; जंगलात नैसर्गिक स्त्रोत आटल्याने टँकरद्वारे पाणीपुरवठा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com