Jalgaon Unseasonal Rain Damage : जिल्ह्यात गारपिटीने हजारो हेक्टरवरील पिके भुईसपाट; अवकाळीचा फटका

Jalgaon Unseasonal Rain Damage : तालुक्यात सोमवारी (ता. २६) रात्री नऊला अचानक वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस सुरू झाला. यात काही वेळ सुपारी एवढी गारपीट झाली.
Crop damage due to hail.
Crop damage due to hail.esakal

Jalgaon Unseasonal Rain Damage : तालुक्यात सोमवारी (ता. २६) रात्री नऊच्या सुमारास वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने शेकडो हेक्टरवरील मका, हरभरा, गहू, कांदा, बाजरी या पिकांचे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने पुन्हा शेतकऱ्यांवर अस्मानी संकट उभे ठाकले आहे.

यातून शेतकरी कसा तग धरेल? याची चिंता लागली आहे. (Jalgaon Thousands of hectares of crops were destroyed by hail in district)

तालुक्यात सोमवारी (ता. २६) रात्री नऊला अचानक वादळी वाऱ्यासह जोराचा पाऊस सुरू झाला. यात काही वेळ सुपारी एवढी गारपीट झाली. तालुक्यातील जवळपास २२ गावांमध्ये गारपीट झाल्याने जवळपास १ हजार १०० हेक्टरवरील गहू, ज्वारी, हरभरा, मका या पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने व्यक्त केला आहे.

या गावांमध्ये झाले नुकसान चोपडा तालुक्यातील सनपुले, तांदलवाडी, निमगव्हण, दोंदवाडे, घाडवेल. (Latest Marathi News)

Crop damage due to hail.
Jalgaon News : जळगावमध्ये आजपासून महासांस्कृतिक महोत्सव

चहार्डी, वेले, मजरेहोळ, मामलदे, अकुलखेडा, यासह जवळपास २२ गावांमध्ये नुकसान झाले असल्याची माहिती मिळाली आहे.

चहार्डी येथे गारपीट

चहार्डी येथे मोठ्या प्रमाणावर गारपीट झाल्याने पिकांचे नुकसान झाले, तसेच गट क्रमांक १३५३ मध्ये असलेले वेदांत पोल्ट्री फार्ममधील कोंबडीच्या लहान २०० पक्षांचा मृत्यू झाला असून, हजारो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Crop damage due to hail.
Jalgaon Unseasonal rain Damage : नुकसानीचे तत्काळ सरसकट पंचनामे करा : जिल्हाधिकारी आयुष प्रसाद

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com