esakal | Jalgaon | दोन अट्टल ‘बॅग लिफ्टर’ला अटक
sakal

बोलून बातमी शोधा

दोन अट्टल ‘बॅग लिफ्टर’ला अटक

जळगाव : दोन अट्टल ‘बॅग लिफ्टर’ला अटक

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव : शहरातील विसनजीनगरातील रहिवासी किशोर भंडारी (वय ६६) यांच्या दुचाकीच्या डीक्कीतून ३७ हजार ८०० रुपयांची रोकड लंपास करण्यात आली होती. जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्यात पोलिसांनी कंजरवाड्यातील दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.

जळगाव शहरातील विसनजीनगरातील एका दुकानाजवळ दुचाकी लावून मिठाई घेण्यासाठी दुकानात गेलेल्या किशोर भंडारी (वय ६६) यांच्या दुचाकीच्या डीक्कीतील ३७ हजार ८०० रुपयांची रोकड चोरट्यांनी लांबवल्याची घटना २९ सप्टेंबरला घडली होती. जिल्‍हापेठ पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद होऊन निरीक्षक रामदास वाकोडे यांच्या पथकाकडून विसनजीनगर भागातील सीसीटव्ही फुटेज संकलित करण्यात येऊन तोंडाला रुमाल बांधलेल्या दोन संशयित कॅमेरात कैद झाले होते.

हेही वाचा: पारोळाः पैशांचा वाद..आईसमोरच विवाहित मुलीचा विषपाजून खून

गुन्हे शोध पथकातील साहाय्यक निरीक्षक महेंद्र वाघमारे, जुबेर तडवी, सलीम शेख, विकास पाहुरकर, सलि तडवी, योगेश साबळे, समाधान पाटील, रेहान खान, महेंद्र पाटील अशांच्या पथकाने संशयितांचा शोध घेत कंजरवाड्यातून अजय गारुंगे (वय ३०, रा. कंजरवाडा), रितेश ऊर्फ चिंचा शिंदे (वय २१, रा. रामेश्वर कॉलनी) अशा दोघांना अटक केली. अटकेनंतर दोन्ही संशयितांना न्या. विनय मुगलीकर यांच्या न्यायालयात हजर केल्यावर न्यायालयाने दोन दिवस पोलिस कोठडीत रवाना करण्याचे आदेश दिले आहे.

दहा हजार जप्त अटकेतील अजय गारुंगे हा रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध जळगाव, धुळे, नाशिकसह महाराष्ट्रातील इतर जिल्ह्या‍तही गुन्हे दाखल आहे. त्याचा साथीदार रितेश ऊर्फ चिंचा शिंदे अशा दोघांनी किशोर भंडारी यांच्यावर पाळत ठेवत अवघ्या सात- आठ मिनटात रोकड लांबवल्याची कबुली दिली आहे. मिळालेल्या रोकडमधून १० हजार रुपये पोलिसांनी जप्त केले आहे.

loading image
go to top