Jalgaon Unseasonal Rain : जामनेर तालुक्यात वादळी तडाखा; ज्वारी, मका, बाजरीसह पिकांचे नुकसान

Hail collected in a plate. and destroyed sorghum, sunflower
Hail collected in a plate. and destroyed sorghum, sunfloweresakal

Jalgaon News : वादळी वाऱ्यासह झालेल्या जोरदार पर्जन्यवृष्टी आणि गारपिटीने जामनेर तालुक्यातील पहूर, पाळधी, हिवरखेडा, तोंडापूर, सांगवी, खर्चाणे, शेरी, लोंढरी, सोनाळे आदी शिवारातील शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. (Jalgaon Unseasonal Rain farmers suffered huge losses due to heavy rainfall and hail accompanied by gale force winds in jamner news)

ज्वारी, बाजरी, मका, सूर्यफूल, टरबूज, केळी, कपाशी यासारख्या पिकांना जबर फटका बसला असून, हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसाने हिरावून नेला आहे.

जामनेर तालुक्यातील पहूर शिवारात बुधवारी (ता. २६) दुपारी वादळी वाऱ्यासह गारपीट व अवकाळी पावसाने हजेरी लावली. पहूरसह सांगवी, खर्चाणे, शेरी, लोंढरी, सोनाळे आदी शिवारात केवळ अर्धा तास झालेल्या पावसाने शेतशिवारात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.

प्रशासनाने त्वरित नुकसानग्रस्त शेतांचे पंचनामे करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी रमेश बनकर यांनी केली आहे. खर्चाणे येथे वाडीवरील रहिवाशांच्या झोपड्यांवरील पत्रे उडाली. सोनाळा भागात टरबुजांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

हेही वाचा : संतुलित आहारातून रोखा फॅटी लिव्हरचा आजार

Hail collected in a plate. and destroyed sorghum, sunflower
Jalgaon Market Committee Election : हमाल मापाडी मतदारसंघात तब्बल 600 मतदार बोगस

पाळधीत शेतीसह घरांचे नुकसान

परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. वादळासह गारपिटीने शेतकऱ्यांचे व स्थानिक रहिवाशांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. यामध्ये प्रकाश धनगर, अजय धनगर व तुळशीराम सोनार यांच्या घरावरील पत्रे उडाली तर काहींच्या गुराढोरांची छपरे उडाली.

यामध्ये प्रकाश धनगर यांच्या घरावरील दोन दिवसांपूर्वीच बसविलेली पत्राची शेड वाऱ्याने उडाली. या परिवाराने भिंतीचा आधार घेतल्याने सुदैवाने हानी टळली. परंतु तुळशीराम सोनार यांच्या घरावरील पत्रे उडाल्याने अनिता समाधान सोनार यांच्या डोक्यावर दगड पडल्याने डोक्याला व हाताला मार बसला असून, त्यांना बारा टाके पडले. तरी शासनाने त्वरित पंचनामे करून शेतकऱ्याना व नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी होत आहे.

तोंडापूर परिसराला झोडपले

परिसराला बुधवारी (ता. २६) दुपारी दोन ते तीनच्या दरम्यान पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. सुमारे तासभर वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू होता. तोंडापूरसह परिसरातील कुंभारी बुद्रूक, भारुडखेडा, ढालगाव, ढालसिंगी, मांडवे परिसरात बुधवारी (ता. २६) दुपारी दोनला अवकाळी पाऊस झाला.

Hail collected in a plate. and destroyed sorghum, sunflower
Jalgaon News : जिल्हाधिकारी कार्यालयात 1 अधिकारी 6 पदे! पहिली घटना

सुमारे एक तास चाललेल्या जोरदार वारा व पावसाने हाहाकार उडाला. वादळी वाऱ्याने नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. या पावसाने शेतात सर्वत्र पाणीच पाणी झाले असून, काही शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काहींनी गेल्याच आठवड्यात शेतातील माल काढून घेतल्याने त्यांना नुकसानीचा सामना करावा लागला नाही.

हिवरखेड्यात बोरांऐवढ्या गारा

येथून जवळच असलेल्या हिवरखेडा (तवा) (ता. जामनेर) येथे दुपारी तीनला वादळासह जोरदार गारांचा पाऊस झाला. अचानक आलेल्या या पावसामुळे व वादळामुळे मका व बाजरी कांदा पिकाचे मोठे नुकसान झाले असून, अनेक वृक्ष पडले आणि घरावरील टिनपत्रेही उडाली पत्रे उडाल्यामुळे पत्रावरील दगड पडून प्रविणा फिरोज तडवी (वय २३) या महिलेस दुखापत झाली आहे

Hail collected in a plate. and destroyed sorghum, sunflower
Jalgaon Water Shortage : 9 गावांना 10 टँकरने पाणीपुरवठा; गावांना तात्पुरती पाणीपुरवठा योजना

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com