esakal | जळगाव: गर्भलिंगनिदान प्रतिबंधक समित्या आहेत कोठे?
sakal

बोलून बातमी शोधा

जळगाव: गर्भलिंगनिदान प्रतिबंधक समित्या आहेत कोठे?

जळगाव: गर्भलिंगनिदान प्रतिबंधक समित्या आहेत कोठे?

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव: जिल्ह्यात गेल्या एप्रिल २०२० पासून कोरोना संसर्गाच्या प्रादुर्भाव सुरू आहे. पूर्णतः हा संसर्ग हद्दपार होत नाही तोपर्यंत सर्वांनाच काळजी घेत जगावे लागणार आहे. दुसरीकडे समाजातील पुरुष-स्त्री यांचे गुणोत्तर अजूनही जुळलेले नाही. एक हजार पुरुषांमागे ९२७ स्त्रिया, असे गुणोत्तर सध्या आहे. ७३ स्त्रिया अद्यापही एक हजार पुरुषांमागे कमी आहेत. यामुळेच समाजात पुरुष-स्त्रियांचे गुणोत्तर असमतोल आहे. गर्भलिंगनिदान कायदा अस्तित्वात आहे.

हेही वाचा: छगन भुजबळ म्हणाले, सचिन पाटिल यांची बदली थांबवणारा मी कोण?

मात्र त्याची अंमलबजावणी कोरोना संसर्गाचा शिरकाव झाल्यापासून यशस्वीरीत्या होत नसल्याचे चित्र आहे. गर्भलिंगनिदान प्रतिबंधक समित्या आहेत कोठे, असा प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

दहा वर्षांपूर्वी गुणोत्तर अतिशय कमी

जळगाव जिल्ह्यात २०११- १२ मध्ये पुरुष- स्त्री गुणोत्तर एख हजार पुरुषांमध्ये केवळ ७९० स्त्रिया असे होते. देशभरात जळगावचे हे सर्वांत कमी गुणोत्तर होते. नंतरच्या कालावधीत २०१७- १८ मध्ये महिलांचे प्रमाण वाढून ८२५ वर गुणोत्तर आले.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण यांनीही कारवायांची मोहीम राबविल्याने हे प्रमाणे ९७२ वर पोचले. ते आजतागायत कायम आहे. हे गुणोत्तर देशभरात अव्वल क्रमांकावर आल्याने जळगाव जिल्ह्याचा सत्कार २०१९ मध्ये दिल्लीत झाला होता. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी याबाबतचा सत्कार स्वीकारला होता.

असे आहेत सोनोग्राफी सेंटर

ग्रामीण भागात - १५०

शहरी भागात - ७० ते ८०

loading image
go to top