जळगाव : पांढऱ्या सोन्याचे भाव गडगडले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Cotton

जळगाव : पांढऱ्या सोन्याचे भाव गडगडले

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

जळगाव (जामनेर) : महिनाभरापूर्वी कपाशीचा भाव प्रतिक्विंटलला यंदा नऊ हजार रुपयांवर गेला होता. आता शेतकऱ्यांकडून जसजसा माल विक्रीसाठी बाजारात यायला सुरवात झाली, तसतसा कपाशीचा भाव व्यापाऱ्यांच्या नफेखोरीच्या लालसेपोटी हजार, बाराशे रुपयांनी गडगडला. साडेआठ हजार ते नऊ हजार रुपये प्रतिक्विंटल जाणाऱ्या पांढऱ्या सोन्याचे (कपाशी) भाव सध्या साडेसात ते सात हजार ८०० रुपयांपर्यंत खाली आले आहेत.

शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा फटका

यंदा पावसाचे आगमन चांगले झाले. मात्र पिके फुले-पातीवर येत असतानाच चक्रीवादळासह तालुक्यात काही ठिकाणी अतिवृष्टीही झाली. त्यात अनेकांच्या शेतात पाणी घुसून पिके वाया गेली, तर काहींची मक्याची कणसे भरत असताना पावसाचा मार बसला. त्यामुळे नगदी पीक असलेल्या कपाशीच्या कैऱ्या-बोंडे अतिवृष्टीने निखळल्या. शिवाय वेचण्यासाठी तयार असणारी कपाशी झाडावरच लाल-पिवळी पडली. परिणामी यंदाच्या कपाशी उत्पन्नात मोठी घट दिसून येत आहे. एकीकडे सुरवातीला चांगला दिसणारा हंगाम पावसाच्या लहरीपणामुळे निम्म्यावर आला, तर दुसरीकडे कधी नव्हे एवढा क्विंटलमागे नऊ हजार रुपयांच्या भावाने शेतकरी समाधानी दिसत असतानाच तो भाव चक्क हजार- बाराशे कमी झाला. गेल्या वर्षीच्या वेचणीच्या मजुरीतही यंदा चार ते पाच रुपयांची वाढ झाली.

हेही वाचा: राज्यातील ग्रामपंचायतीच्या रिक्त जागांच्या पोट निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर!

आधी सात ते आठ रुपये प्रतिकिलो आता मात्र दहा ते बारा रुपयांपर्यंत कपाशी वेचणीसाठी मोजावे लागतात. आंतरराष्ट्रीय बाजारात कपाशीला चांगला भाव मिळत असल्याने येथेही तब्बल ९००० हजार रुपये प्रतिक्विंटल गेला होता. मात्र व्यापाऱ्यांच्या नफेखोरीमुळे महिन्यातच हजार-बाराशेने कमी झाला, तर यंदा वीज, खते आणि मजुरीत वाढ झाल्याने हातात काहीच उरेनासे झाले आहे.

loading image
go to top