Jalgaon News : ‘जन्मबंध’ ने फुलवले 154 दुगंभलेले संसार; तंटा निवारण समितीकडून पीडितांना दिलासा

wedding News
wedding Newsesakal

Jalgaon News : अलीकडे घटस्फोटांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाल्याचे दिसून येत आहे. अनेकदा अगदी क्षुल्लक कारणावरून देखील पती-पत्नीमध्ये लग्नानंतर काही दिवसांतच घटस्फोटाचे वादळ घोंगावते.

वाद थेट न्यायालयात पोचतो. मात्र, असे वादळ क्षमविण्यासाठी सुवर्णकार समाजातील जन्मबंध ग्रुपने पुढाकार घेतला आहे.

तंटा निवारण समितीच्या माध्यमातून आतापर्यंत १५४ जोडप्यांमध्ये समेट घडवून आणला आहे. (Janmabandh blossomed 154 Disturb Marriage lifeactivities in Goldsmiths Society Relief to victims Tension Redressal Committee Jalgaon News )

विशेष म्हणजे, सोशल मीडियाच्या ७० कम्युनिटी ग्रुपद्वारे कार्यरत असलेल्या ‘जन्मबंध’ने पीडितांना मोफत मार्गदर्शन देण्यासाठी वकिलांची फोरम देखील स्थापन केले आहे.

सध्या प्रत्येक समाजासमोर घटस्फोट हा चिंतेचा विषय बनला आहे. लग्नानंतर समज गैरसमजुतीतून भांडण अथवा वादविवाद झाले तर वाद न्यायालयात जातो. सुवर्णकार समाजात घटस्फोटांचे प्रमाण १६ टक्क्यांपर्यंत पोचले आहे.

परंतु हे सर्व गैरप्रकार टाळण्यासाठी जन्मबंध संस्थापक अध्यक्ष प्रभाकर मोरे (माहीम, मुंबई) तसेच समाजातील जाणकार मंडळींनी जन्मबंध तंटा निवारण समितीची संकल्पना अमलात आणली.

या जन्मबंध तंटा निवारण समितीने आतापर्यंत अशा १५४ जोडप्यांमध्ये समेट घडवून आणला आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये समुपदेशन करूनही मने जुळत नसतील तर अपवादात्मक स्थितीत व्यासपीठावरच घटस्फोटही करून दिले आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

wedding News
Jalgaon Crime News : खुनाच्या घटनांनी चाळीसगाव हादरले! वेगवेगळ्या घटनांत दोघांचा खून

..असे चालते कामकाज

‘जन्मबंध’ने प्रत्येक गावनिहाय तंटा निवारण समिती स्थापन केली आहे. गावोगावी हे जाळे निर्माण केले असून, अकरा जणांच्या समितीत पदसिद्ध अध्यक्ष समितीचे नेतृत्व करतो. कम्युनिटी ग्रुपवरून आलेल्या तक्रारदाराकडून प्रत्यक्ष अर्ज भरून घेतला जातो.

तो सेंट्रल डेस्कचे समन्वयक शहाद्याचे निवृत्त प्राचार्य जीवन जगदाळे यांच्याकडे जमा केला जातो. दर आठवड्याला तीन ते चार घटस्फोटांची प्रकरणे समितीकडे येतात. सुवर्णकार समाजातील सर्व १८ पोटजातींच्या समाजबांधवांना या कामी मार्गदर्शन व साहाय्य केले जाते.

wedding News
Crime News : विमानात फोनवर बोलताना 'बॉम्ब'चा उल्लेख भोवला! महिलेच्या तक्रारीनंतर एकाला अटक

तडजोडीसाठी मेळावे

पती-पत्नीमधील वाद मिटविण्यासाठी तंटा निवारण समितीमार्फत विविध शहरात मेळावे घेतले जातात. पहिला मेळावा हा चाळीसगावला घेण्यात आला होता. या मेळाव्यात १२ प्रकरणे समितीसमोर आली होती.

यात बहुतांश प्रकरणांमध्ये पती-पत्नी नांदायला तयार होते, परंतु दोन्हीकडील कुटुंबांचा हस्तक्षेप होत असल्याचे समोर आले. परंतु अशी सर्व प्रकरणे समितीने व्यवस्थितपणे हाताळून या जोडप्यांचे मनोमिलन घडवून आणले.

घटस्फोटांच्या प्रकरणांसंदर्भात लवकरच पुढील मेळावा नंदुरबारला घेतला जाणार आहे. यात नंदुरबारसह जळगाव, धुळे, नाशिक जिल्ह्यातील समाजातील घटस्फोटांची प्रकरणे वकिलांना बोलावून सोडवली जाणार आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

wedding News
Jalgaon Crime News : खुनाच्या घटनांनी चाळीसगाव हादरले! वेगवेगळ्या घटनांत दोघांचा खून

जुळले तीन हजार विवाह

‘जन्मबंध’ ग्रुप प्रामुख्याने २०१५ पासून सुवर्णकार (सर्व शाखीय) समाजासाठी वधू-वरांची लग्न जुळविण्यासाठी स्थापन झाला.

वॉट्सॲपच्या २२० ग्रुपच्या माध्यमातून आतापर्यंत ३ हजार लग्न नि:शुल्क जुळवून आणली आहेत.

आता ६० कम्युनिटी ग्रुपच्या माध्यमातून महाराष्ट्रासह गुजरात, राजस्थान, गोवा, मध्य प्रदेश, विदेशात अमेरिकेसह समाजबांधव जेथे असतील तेथेही समाजातील मंडळींचा सहभाग असतो.

या कार्यासाठी सुमारे पाचशेवर समाजबांधव कार्यरत आहेत. त्यामुळे डिजिटल माध्यमातून वधू-वरांच्या बायोडाटाविषयाची माहिती सहज उपलब्ध होऊ शकते.

wedding News
Jalgaon BJP Election News : भाजपचे Mission Election... विधानसभा निवडणूकप्रमुख जाहीर

पीडितांच्या मदतीसाठी ६७ वकिलांचे फोरम

घटस्फोटांच्या प्रकरणात दोन्ही बाजूकडून बऱ्याचदा खोटे आरोप केले जातात. चारित्र्यहनन केले जाते. अशा पीडित महिला व पुरुषांसाठी दोन वेगवेगळे फोरम कार्यरत आहेत.

या फोरममध्ये ६७ वकिलांसह दोन निवृत्त न्यायाधीश आहेत. ते पीडितांना नि:शुल्क कायदेशीर मार्गदर्शनाबरोबरच योग्य सल्ला देऊन त्यांचे समाधान करतात.

""पुढचे पाऊल म्हणून जन्मबंध फाउंडेशन ट्रस्टची स्थापना करण्यात आली असून, त्या द्वारे विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. या ट्रस्टचे मुख्यालय नाशिक येथे असून, याला देखील सभासदांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे."'

- प्रभाकर मोरे, संस्थापक, जन्मबंध फाउंडेशन, मुंबई

wedding News
Jalgaon News : ‘आपल्याच बापाचा’ रस्ता असल्यासारखी मुजोरी; 'या' मार्गाला अतिक्रमणाचा विळखा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com