Jalgaon News : पाचोरा येथील जवानाचा छत्तीसगडमध्ये मृत्यू; आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Jalgaon News : पाचोरा येथील जवानाचा छत्तीसगडमध्ये मृत्यू; आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

Jalgaon News : येथील भडगाव रोड भागातील ‘एमआयडीसी’ कॉलनीतील रहिवासी व सध्या बिजापूर (छत्तीसगड) येथे ‘सीआरपीएफ’मध्ये हेड कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेल्या ४३ वर्षीय जवानाचा कर्तव्यावर असताना हृदयविकाराने मृत्यू झाल्याची घटना बुधवारी (ता. १३) घडली.

जवानाचे पार्थिव पाचोरा येथे आणून शुक्रवारी (ता. १५) शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या कुटुंबीयांकडून सांगण्यात आले. ( jawan from Pachora died in Chhattisgarh jalgaon news)

पवन दिलीपराव देशमुख असे शहीद जवानाचे नाव असून ते २००३ मध्ये ‘सीआरपीएफ’मध्ये भरती झाले होते. त्यांनी जम्मू, काश्मीर, चंदीगड, मणिपूर, छत्तीसगड आदी ठिकाणी सेवा बजावली. उत्कृष्ट देश सेवा बजावल्याने त्यांना निवृत्तीनंतरही वाढीव सेवा मिळाली होती. दीड महिन्यांच्या सुट्टीवर ते पाचोरा येथे आले होते. पंधरा दिवसांपूर्वीच बिजापूर (छत्तीसगड) येथे कर्तव्यावर रुजू झाले होते.

दोन दिवसांपूर्वी त्यांनी भ्रमणध्वनीवरून आपल्या कुटुंबाशी संपर्क करून सर्वांशी बोलणे केले. बुधवारी (ता. १३) त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची माहिती कुटुंबीयांना कळविण्यात आल्यानंतर देशमुख कुटुंबीय कमालीचे हादरले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Jalgaon News : पाचोरा येथील जवानाचा छत्तीसगडमध्ये मृत्यू; आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Jalgaon News : एकीकडे कौटुंबिक हिंसाचारअंतर्गत खटला अन्‌ दुसरीकडे मृत्युशी झुंज..! कॅन्सरग्रस्त पीडिता न्यायालयात

शहीद पवन देशमुख यांच्या पश्चात वृद्ध आई, वडील, पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.

त्यांची अंत्ययात्रा ‘एमआयडीसी’ कॉलनीतील राहत्या घरापासून निघेल. त्यांच्या निधनामुळे हळहळ होत आहे.

Jalgaon News : पाचोरा येथील जवानाचा छत्तीसगडमध्ये मृत्यू; आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
Ganeshotsav 2023 : गणेश मंडळांनी नियमांचे काटेकोर पालन करावे; जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे आवाहन

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com