jayant patil statement about eknath khadse lok sabha election jalgaon news
jayant patil statement about eknath khadse lok sabha election jalgaon newsesakal

Jayant Patil News : लोकसभा निवडणुकीचे शिवधनुष्य.... जयंत पाटील यांचे एकनाथ खडसेंना आवाहन

Jayant Patil News : लोकसभा निवडणूक लढविण्याचे शिवधनुष्य एकनाथ खडसे यांनी उचलावे व ज्याप्रमाणे भारतीय जनता पक्षाला दोन्ही जागा निवडून दिल्या, त्याप्रमाणे ‘राष्ट्रवादी’लाही लोकसभेच्या दोन्ही जागा निवडून देण्यासह विधानसभेच्या जिल्ह्यातील सर्व जागा महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केले. (jayant patil statement about eknath khadse lok sabha election jalgaon news)

जळगाव येथे सागर पार्क मैदानावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्वाभिमान सभेत ते बोलत होते. या वेळी पाटील म्हणाले, की गेल्या २५ ते ३० वर्षांत जळगाव जिल्ह्यातील लोकसभेचे दोन्ही खासदार भाजपचे निवडून दिले आहेत. त्यामुळे तुम्ही आता हे कार्य राष्ट्रवादी काँग्रेसकडून उचलले पाहिजे. शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्‍वास ठेवून खडसे काम करीत आहेत.

त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीत लढण्याचे शिवधनुष्य तुम्ही उचलले पाहिजे. तसेच, आगामी विधानसभेच्या जिल्ह्यातील सर्व जागा महाविकास आघाडीला जिंकण्यासाठी तुम्ही प्रयत्न केले पाहिजेत. यात तुम्हाला निश्‍चित यश येईल, असा मला विश्‍वास आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.

सन १९८५ मध्ये या जिल्ह्याने तब्बल सात आमदार निवडून देऊन १०० टक्के निकाल दिला होता, ही या जिल्ह्याची परंपरा आहे. त्यामुळे तुम्हाला यश मिळेल, याचा विश्‍वास आहे. जयंत पाटील यांच्या वक्तव्यामुळे एकनाथ खडसे जिल्ह्यातून रावेर लोकसभा निवडणूक लढविण्याबाबत चर्चा सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

jayant patil statement about eknath khadse lok sabha election jalgaon news
Jayant Patil : 'शासन आपल्या दारी'मध्ये व्यस्त सरकारला 'दुष्काळ आपल्या दारी'ची जाणीव आहे का? पाटलांनी मांडली दाहकता

मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर टीका

जालना येथील लाठीहल्ला प्रकरणी जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्यावर टीका केली. लाठीहल्ल्याचे आदेश आम्ही दिलेले नाहीत, असे ते म्हणत आहेत. जर या मंत्र्यांना न विचारताच जर लाठीहल्ला होत असेल, तर तुम्ही सरकारमध्ये काय करता, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

संविधान बदलण्याचा प्रयत्न : आव्हाड

राज्याचे माजी मंत्री व राष्ट्रवादी कॉंगेसचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड या वेळी म्हणाले, की ‘वन नेशन- वन इलेक्शन’ हा प्रयत्न म्हणजे अध्यक्षीय पद्धतीकडे वाटचाल करण्याचा आहे. यानुसार देशाचे संविधान बदलण्याचा हा प्रयत्न आहे. जनतेने तो हाणून पाडला पाहिजे.

‘ईडी’च्या धाकाने आमदार गेले : देशमुख

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या आमदारांनी पक्षबदल करण्याबाबत टीका करताना माजी गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले, की हे आमदार केवळ ‘ईडी’च्या धाकाने तिकडे गेले आहेत. मलाही ‘ईडी’चा धाक दाखविण्यात आला, त्या वेळी आपण कारागृहात गेलो; परंतु त्यांच्याकडे गेलो नाही.

jayant patil statement about eknath khadse lok sabha election jalgaon news
Jayant Patil : अजित पवार यांच्याशी मतभेद असल्याच्या चर्चांवर जयंत पाटील स्पष्टच बोलले; म्हणाले...

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com