
Jalgaon News : जोगलखोरी-वराडसीम बससेवा अखेर सुरू; विद्यार्थी, ग्रामस्थांची झाली सुविधा
Jalgaon News : मौजे जोगलखोरी, वराडसीम येथे आदिवासी भिल्ल समाजाची वस्ती असून, या गावासाठी त्यांच्या मागणीनुसार एसटी बससेवा सुरू करण्यात आली आहे. (Jogal Khori Varadsim bus service finally started jalgaon news)
या गावातील लोकांना प्रवासासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसची व्यवस्था नसल्याने गावातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी, गावातील लोकांना बाहेरगावी जाण्यासाठी, तसेच उपचार करण्यासाठी खासगी वाहनाने प्रवास करावा लागत होता. मौजे जोगलखोरी येथे महामंडळाची बससेवा सुरू करावी, अशी ग्रामस्थांची मागणी होती.
हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?
त्या अनुषंगाने यावल येथील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे सहाय्यक प्रकल्प अधिकारी व राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विभाग नियंत्रकांनी या गावाला भेट देऊन प्रवासाबाबत असणाऱ्या अडचणी समजून घेतल्या.
त्यानुसार आता २४ मेपासून जोगलखोरी वराडसीममार्गे भुसावळ नियमित बससेवा सुरू झाली आहे. या बससेवेमुळे विद्यार्थी, ग्रामस्थ यांच्या अडचणी दूर झाल्याने त्यांनी समाधान व्यक्त केले.