KBCNMUचा 30 वा दीक्षांत सोहळा दिमाखात

कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचा तिसाव्या दीक्षांत सोहळा दिमाखात पार पडला.
KBCNMU 30th Convocation Ceremony
KBCNMU 30th Convocation Ceremonyesakal

जळगाव : औद्योगिक क्रांतीत पारंपरिक नोकऱ्यांचा ताबा नव्या यंत्रसामग्रीने घेतल्यामुळे येणाऱ्या काळात ४० टक्क्यांपेक्षा जास्त नोकऱ्या गमावण्याची भीती आहे. मात्र, नवीन नोकऱ्याही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होणार असून त्यासाठी विविध कौशल्ये गरजेची ठरणार आहेत. ती कौशल्य विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचे आव्हान असून विद्यापीठांनी त्यासाठी सज्ज राहावे, असे आवाहन राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषदेच्या कार्यकारी समितीचे अध्यक्ष प्रा.भूषण पटवर्धन यांनी केले. (KBCNMU 30th Convocation Ceremony)

मंगळवारी झालेल्या कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या तिसाव्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. या वेळी कुलपती तथा राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांची कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून ऑनलाइन उपस्थिती होती. प्रा.पटवर्धन यांनी दुरदृश्य प्रणालीद्वारे दीक्षांत भाषण केले.

नवे शैक्षणिक धोरण गुणवत्तेला बळ देणारे

प्रा. पटवर्धन म्हणाले की, डॉ.कस्तुरीरंगन यांच्या नेतृत्वाखालील नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दूरदर्शी असून विद्यापीठ अनुदान आयोगाच्या शैक्षणिक गुणवत्ता सुधारणेला बळ देणारे आहे. सध्याची पारंपरिक विद्यापीठे वर्गशिक्षणावर भर देत आहेत. आजचे विद्यार्थी मात्र व्यावहारिक ज्ञान आणि कौशल्य मिळविण्यासाठी नावीन्यपूर्ण मार्ग शोधत आहेत.

KBCNMU 30th Convocation Ceremony
विद्यार्थ्यांना शिक्षण घेतानाच मिळताहेत नोकरीच्या चांगल्या संधी

एनसीसीसाठी हवे जवानांसोबतचे ‘सेमिस्टर’

राष्ट्रीय सेवा योजना आणि राष्ट्रीय छात्र सेना यांच्या उपक्रमांमध्ये बदलाची गरज असून रासेयोसाठी शेती, उद्योग, व्यवसाय आणि सामुदायिक संस्थामध्ये काम करण्यासाठी एक सत्र तसेच राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांसाठी संरक्षण, सुरक्षा, पोलिस आदींमध्ये एक सत्र (सेमिस्टर) घालवता यायला हवे.

कुलगुरू प्रा.व्ही.एल.माहेश्वरी यांनी विद्यापीठाचा विकास आढावा सादर केला. तसेच भविष्यकालीन योजनांचाही संकल्प बोलून दाखविला. तत्पूर्वी दीक्षांत मिरवणुकीने सभागृहात कुलगुरू, अधिष्ठातांचे आणि प्राधिकरणाच्या सदस्यांचे आगमन झाले. विद्यापीठाचा मानदंड घेऊन सहायक कुलसचिव भास्कर पाटील मिरवणुकीच्या अग्रभागी होते. दीक्षांत मिरवणुकीत कुलगुरू, प्रभारी प्र-कुलगुरू, प्रभारी कुलसचिव, प्रभारी संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ व चार अधिष्ठाते तसेच अधिसभा, विद्या परिषद आणि व्यवस्थापन परिषदेचे सदस्य सहभागी होते.

यांची होती उपस्थिती

अधिष्ठातांमध्ये, विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता, प्राचार्य आर.एस.पाटील, वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता, प्राचार्य पी.पी.छाजेड, मानव्य विद्या विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता, प्राचार्य डॉ.पी.एम.पवार, आणि

आंतरविद्याशाखीय अभ्यास विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता, प्राचार्य डॉ. ए.आर.राणे यांचा समावेश होता. या वेळी मंचावर व्यवस्थापन परिषद सदस्य दिलीप पाटील, प्राचार्य आर.एस.पाटील, प्राचार्य पी.पी.छाजेड, प्राचार्य एल.पी.देशमुख, प्राचार्य आर.पी.फालक, प्रा.मोहन पावरा, डॉ.महेश घुगरी, दीपक पाटील, विवेक लोहार, प्रा.जे.बी.नाईक, डॉ.सौ.प्रीती अग्रवाल, डी.पी.नाथे, संतोष चव्हाण, एस.आर.गोहिल, प्रा.डी.एस.दलाल उपस्थित होते. कार्यक्रमानंतर कुलगुरू प्रा.माहेश्वरी यांच्या हस्ते सुवर्णपदके वितरित करण्यात आली. पालकांसह सुवर्णपदक प्राप्त विद्यार्थी मंचावर पदक घेण्यासाठी उपस्थित होते. आशुतोष पाटील व प्रा.सुरेखा पालवे यांनी सूत्रसंचालन केले.

KBCNMU 30th Convocation Ceremony
वर्गात प्रश्न विचारते म्हणून टॉपर विद्यार्थिनीला बोर्डाच्या परीक्षेत केलं नापास

राजकीय हस्तक्षेप नकोच

प्रा.पटवर्धन यांनी विद्यापीठांमधील राजकीय हस्तक्षेप बंद व्हावा तसेच महत्त्वाची पदे प्रभारी राहू नयेत असे मत बोलून व्यक्त करत बहिणाबाई चौधरी यांच्या ‘मानसा मानसा कधी व्हशीन मानूस’ या कवितेने दीक्षांत भाषणाचा समारोप केला.

प्रेरणादायी काम करा : कोशियारी

अध्यक्षीय भाषणात राज्यपाल कोशियारी म्हणाले की, आताच्या नवीन शैक्षणिक धोरणात उत्तम नागरिक घडविला जाणार आहे. देश नव्या युगात प्रवेश करण्यासाठी सज्ज झाला असून पदवीधर झालेली ही नवी पिढी मोठे योगदान देईल अशी अपेक्षा व्यक्त केली. ‘अरे संसार संसार..’ या बहिणाबाईंच्या कवितेचा उल्लेख करत श्री कोशियारी यांनी आपल्या जीवनातून लोकांना प्रेरणा मिळावी अशा प्रकारचे काम केले जावे अशी अपेक्षा बोलून दाखविली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com