Latest Marathi News | शहरातील महाविद्यालयातून अल्पवयीन मुलीचे अपहरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Minor girl kidnapped In Jalgaon

Jalgaon Crime Update : शहरातील महाविद्यालयातून अल्पवयीन मुलीचे अपहरण

जळगाव : शहरातील शिरसोली रोडवरील एका महाविद्यालयातून १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी गुरुवारी (ता. १७) एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.

जळगाव तालुक्यातील एका गावातील ही अल्पवयीन मुलगी जळगाव-शिरसोली रोडवर असलेल्या महाविद्यालयात आली होती. मात्र, घरी परतली नाही. तिचा शोध घेतला असता, ती कुठेही आढळून आली नाही. (Kidnapping of a minor girl from a city college Jalgaon Crime News)

हेही वाचा: Jalgaon : Truck Reverse घेताना हमालाचा मृत्यू; MIDCत अपघात

महाविद्यालयातून तिला अज्ञात व्यक्तीने फूस लावून पळवून नेवून तिचे अपहरण केल्याची खात्री झाल्यावर अल्पवयीन मुलीच्या वडिलांनी गुरुवारी एमआयडीसी पोलिसांत तक्रार दिली.

या तक्रारीवरून अपहरणाचा गुन्हा दाखल झाला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल मोरे तपास करीत आहेत.

हेही वाचा: Jalgaon Crime Update : बसमध्ये चढताना Mobile चोरणाऱ्या चोरट्यास अटक