Mobile-Theft
Mobile-Theftesakal

Jalgaon Crime Update : बसमध्ये चढताना Mobile चोरणाऱ्या चोरट्यास अटक

जळगाव : नवीन बसस्थानकात बसमध्ये चढत असताना, गर्दीचा फायदा घेत विद्यार्थ्याचा मोबाईल लांबविणाऱ्या चोरट्याला जिल्हापेठ पोलिसांनी अटक केली आहे.

एरंडोल येथील शेख साहिल शेख सहीद मन्यार हा त्याचा मित्र सय्यद शाहेद्दीन अहमद शोकत अली याच्यासोबत गुरुवारी (ता. १७) जळगाव शहरात आला होता.(Thief stole a mobile while boarding a bus arrested Jalgaon Crime News)

Mobile-Theft
Jalgaon Crime Update : जिल्हा रुग्णालयात तिघांमध्ये हाणामारी

दोघेही पुन्हा एरंडोल येथे जाण्यासाठी दुपारी अडीचच्या सुमारास नवीन बसस्थानकात आले. एरंडोल जाण्यासाठी जळगाव-धुळे बसमध्ये चढताना गर्दीचा फायदा घेत वसीम शेख कादर (वय ३८, रा. ईमलीपुरा, भुसावळ) या चोरट्याने शेख साहिल याच्या खिशातून मोबाईल लांबविला.

हा प्रकार लक्षात आल्यावर शेख साहिलने शोध घेतल्यावर वसीम शेखने मोबाईल लांबविल्याचे लक्षात आले. चोरट्याला त्याच जागी चोप देण्यात येऊन पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले.

याप्रकरणी शेख साहिल शेख मन्यार याच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. महिला पोलिस नाईक पल्लवी मोरे तपास करीत आहेत.

Mobile-Theft
Jalgaon Educational Update : अभियांत्रिकीच्या परीक्षा पुढे ढकलल्या

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com