Latest Marathi News | बकालेंच्या अटकेच्या मागणीसाठी आज सर्वसमावेशक मोर्चा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Discuss Abot Kirankumar Bakale Controversial statement Case

Kirankumar Bakale Controversial statement Case: अटकेच्या मागणीसाठी आज मोर्चा

पाचोरा,(जि. जळगाव): येथील स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक किरणकुमार बकाले यांनी मराठा समाजाबद्दल केलेले मानहानीकारक वक्तव्य व अशोभनीय कृत्य विचारात घेऊन त्यांना तत्काळ अटक करून कठोर शासन करावे, या मागणीसाठी शुक्रवारी (ता. ३०) सर्वसमावेशक भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती शिवाजी महाराज ब्रिगेडचे संस्थापक अध्यक्ष अशोक शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली.


शासकीय विश्रामगृहावर अशोक शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी व्ही. पी. पाटील, रोशन मराठे, जे. बी. पाटील, किरण बोरसे, प्रवीण जाधव, हरिभाऊ पाटील, जयदेव पाटील, राजेंद्र पाटील, रवींद्र पाटील, हिरालाल पाटील, अनिल मराठे, मुन्ना पाटील, पी. एस. पाटील, दीपक पाटील, दीपक मुळे, रामा जठार, अंकुश ठाकरे, आबा देवरे, नितीन पाटील, सुनील पाटील, संतोष पाटील, प्रमोद भुसारे, रवी देवरे हे विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.(Kirankumar Bakale Controversial statement Case public march today to demand Bakale arrest Jalgaon News)

हेही वाचा: Cyber Crime Case : आमदार मंगेश चव्हाण यांचे फेसबुक अकाऊंट हॅक !

अशोक शिंदे यांनी स्पष्ट केले, की बकाले यांचे वक्तव्य व कृत्य गंभीर असून, त्यांना वाचविण्याचे प्रयत्न काही जणांकडून केले जात आहेत. लोकप्रतिनिधी मौन धारण करून आहेत. काही संघटनांवर दबाव आणला जात आहे. ही बाब अयोग्य अन्याय्य बकाले यांच्यावर त्यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात कठोर कारवाई न झाल्यास उद्या कोणीही अशा स्वरूपाचे वक्तव्य करून करेल, यासाठी बकाले यांना त्वरित अटक करून कठोर शासन करावे, या मागणीसाठी शुक्रवारी (ता. ३०) जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात येणार असून, यात सुमारे ५० हजारांचा जनसमुदाय सहभागी होण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. हरिभाऊ पाटील, रोशन मराठे यांनीही मनोगत व्यक्त करून मोर्चात सहभागी होण्याबाबत आवाहन केले.

हेही वाचा: jalgaon : आठवडेबाजाराचा भाजीपाला पडला महागात

टॅग्स :Jalgaoncrime