पिशवीभर कांद्यासाठी पेटविली भुसावळ येथे किसान एक्स्प्रेस रेल्वे

कांद्याची वाहतूक करणाऱ्या किसान एक्स्प्रेसच्या बोगीला आग लागल्याने एकच खळबळ
Kisan Express carrying onions caught fire  at Bhusawal
Kisan Express carrying onions caught fire at Bhusawalsakal

भुसावळ : कांद्याची वाहतूक करणाऱ्या किसान एक्स्प्रेसच्या बोगीला आग लागल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना भुसावळ रेल्वेस्थानकात फलाट क्रमांक सातवर सोमवारी (ता. १४) सायंकाळी सातच्या सुमारास घडली. ही गाडी सांगोल्याहून मुझफ्फरपूरला जात होती. यातील बोगीला आग लागून कांद्याच्या गोण्या जळाल्या आहेत.

सांगोल्याहून मुझफ्फरपूरकडे जाणाऱ्या कांदा वाहतुकीच्या रेल्वे वॅगनला सोमवारी आग लागली. ही गाडी सायंकाळी सातच्या सुमारास फलाट क्रमांक सातवर उभी असताना स्थानकावरील बोग्यांची तपासणी करणाऱ्या कर्मचाऱ्याच्या ही बाब लक्षात आली.

इंजिनपासून पाचव्या क्रमांकाच्या बोगीतून धूर येत असल्याचे त्यांना समजले. यानंतर त्यांनी ताबडतोब गाडीचे चालक व गार्ड यांना सूचना दिली. या वेळी फलाटावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी तत्काळ धाव घेत आग विझविण्यासाठी मदत केली. पार्सल अधिकारी तसेच आरपीएफ पथकानेही रेल्वे बोगीजवळ धाव घेत आग आटोक्यात आणली. घटनेची माहिती मिळताच स्टेशन डायरेक्टर ओ. पी. अय्यर, एडीआरएम नवीन पाटील, एसीएम (गुड्स) अनिल बागडे, गार्ड एम. आर. खान, आरपीएफ निरीक्षक मीना, सिग्नल विभागाचे मलिक, आरपीएफ उपनिरीक्षक यादव, एडीआर, मोहित मंडलेकर आदींनी भेट देऊन पाहणी केली. यानंतर बोगीतून जळालेल्या कांद्यांच्या गोण्या बाहेर काढण्यात आल्या. उशिरापर्यंत हे काम सुरू असल्याने नुकसानीचा नेमका आकडा समजू शकला नाही.

माथेफिरू महिला सीसीटीव्हीत कैद

किसान एक्स्प्रेस फलाट क्रमांक सातवर उभी असताना बोगीत आग लागताच रेल्वेस्थानकावर एकच धावपळ उडाली. या वेळी खाद्यपदार्थ विक्रेत्यांनी लागलीच बादल्यांनी पाणी फेकून आग विझविली. या वेळी आरपीएफ अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली. नेमकी आग कशी लागली, याची पाहणी करण्यासाठी सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, एका माथेफिरू महिलेने आगपेटीची काडी पेटवून रेल्वेच्या डब्यात फेकल्याचे सीसीटीव्हीत कैद झाले आहे. रेल्वे पोलिस या महिलेचा शोध घेत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com