Latest Marathi News | भुसावळला युवकावर चाकूहल्ला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Crime News

Jalgaon Crime Update : भुसावळला युवकावर चाकूहल्ला

भुसावळ : शहरातील जामनेर रस्त्यावरील हिमालय पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी (ता. १८) दुपारी दोनच्या सुमारास तरुणावर चाकूहल्ला केला.

या प्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला. महिनाभरापूर्वी रोहित नवगिरे याच्यासोबत झालेल्या भांडणाच्या कारणावरून खुन्नस ठेवून तीन अल्पवयीन मुलांनी आदित्य कैलास सावकारे (रा. यशवंत कॉलनी, जामनेर रोड, भुसावळ) याला चाकू, लाठी, प्लॅस्टिकचा पाइप व विटांच्या तुकड्यांनी उजव्या बरगडीवर तसेच पाठीमागून कंबरेजवळ मारून जखमी केले, तसेच काठीने फिर्यादीला डोक्यावर मारहाण करून गंभीर जखमी केले. (Knife attack on youth in Bhusawal Jalgaon Crime News)

हेही वाचा: Jalgaon Rice Stock Case: पंचनाम्यात रेशन तांदळाच्या शासकीय गोण्या निष्पन्न

या प्रकरणी आदित्य सावकारे यांच्या फिर्यादीवरून बाजारपेठ पोलिसांत गुन्हा दाखल झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन वाघमारे तपास करीत आहे.

घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी सोमनाथ वाघचौरे, बाजारपेठ पोलिस ठाण्याचे निरीक्षक राहुल गायकवाड, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुदर्शन वाघमारे, मंगेश गोंटला, हरीश भोये यांनी भेट दिली. सर्व संशयित विधिसंघर्षित बालक असल्याने सोमवारी बालन्यायालयात हजर करणार आहे.

हेही वाचा: Fraud : हरितगृह उभारणीच्या नावाने शेतकऱ्याची फसवणूक