Sakal Impact : ‘कोटेचा’ प्रकरणी चौकशीसाठी तीन सदस्यीय समिती; विद्यापीठाचा निर्णय

KBCNMU
KBCNMUesakal

भुसावळ (जि. जळगाव) : येथील श्रीमती प. क. कोटेचा (kotecha case) महिला महाविद्यालयाने प्राचार्यपदासाठी अर्ज न स्वीकारल्याच्या प्रकरणाचा ‘सकाळ’ने पाठपुरावा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला या प्रकाराची दखल घेणे भाग पडले आहे. (kotecha case 3 member committee to investigate the Kotecha case after Followed by Sakal newspaper jalgaon news )

विद्यमान प्राचार्यांना मुदतवाढ, अन्य उमेदवारांच्या अर्जांमधील घोळ अशा एकूणच प्रकरणावर विद्यापीठाने तीन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त केली आहे. ही समिती येत्या आठवड्यात चौकशी पूर्ण करून अहवाल सादर करेल, अशी अपेक्षा आहे. कोटेचा महाविद्यालयातील प्राचार्य नियुक्तीच्या प्रक्रियेत अनियमितता झाल्याचे अनेक प्रकार रोज समोर येत आहेत.

विद्यापीठाने गडबड केल्याचा संशय : जयश्री न्याती

महाविद्यालयात पदभरती करीत असताना संस्थाचालकांना प्रस्ताव सादर करावा लागतो. त्या प्रस्तावासोबत ते आज पदावर असल्याचे पुरावे सादर करावे लागतात व तशी नोंद करावी लागते. मात्र 'सकाळ'च्या हाती आलेल्या पुराव्यानुसार धर्मदाय आयुक्तांच्या पीटीआर रजिस्टरमध्ये संबंधित अध्यक्ष व सचिवाची नोंदच नसल्याचे लक्षात आले आहे.

त्या संदर्भात या संस्थेच्या संस्थापिका चेअरमन जयश्री न्याती यांनी विद्यापीठात कुलगुरू, कुलसचिव, प्र. कुलगुरू व व्याख्याता मान्यता विभाग, शिक्षण सहसंचालक यांच्याकडे सविस्तर तक्रार अर्ज सादर केला आहे.

हेही वाचा : देशातले ३२ म्युच्युअल फंडांचं व्यवस्थापन आहे महिलांच्या हाती...

KBCNMU
Jalgaon News : वाढीव भाडे, घरपट्टीला शासनाची स्थगिती; अस्थिर झालेल्या पारोळेकरांना दिलासा

याचिकाही प्रलंबित; तरी जाहिरात मंजूर कशी?

या तक्रार अर्जासोबत पीटीआर रजिस्टरची अद्ययावत प्रत सुद्धा सादर केली आहे. या प्रतीवर शेड्यूल वनमध्ये संबंधित संस्थेचे सचिव व अध्यक्ष यांचे नाव नाही. कारण त्यांचा चेंज रिपोर्ट आजतागायत मंजूर झालेला नाही.

त्याचप्रमाणे या संस्थेच्या निवडणूक संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या संभाजीनगर खंडपीठाकडे याचिका क्र. १३६/२००० प्रलंबित आहे. असे असताना विद्यापीठाने ही जाहिरात मंजूर केलीच कशी? या प्रक्रियेमध्ये विद्यापीठातील कोणाचा सहभाग आहे? तसेच व्याख्याता मान्यता विभागातील कोणत्या अधिकाऱ्यांचा सहभाग आहे? याचा शोध घेण्याची मागणी जयश्री न्याती यांनी केली आहे.

कारण प्राचार्याच्या पुनर्नियुक्तीसाठी शासनाच्या व विद्यापीठाच्या काही मार्गदर्शक सूचना व नियमावली आहेत. त्या सर्व बाबी पायदळी तुडवून विद्यमान प्राचार्यांच्या पुनर्नियुक्तीसाठी जोमाने प्रयत्न सुरू आहेत.

KBCNMU
Sparrow Count Activity : निसर्गमित्रतर्फे 3 दिवसीय चिमणी गणना उपक्रम; 'या' तारखांना मोहीम

अर्जदारांच्या मुलाखती न घेताच ही प्रक्रिया एका महिन्याच्या आत राबवण्याचे प्रयोजन काय? असाही प्रश्न न्याती यांनी उपस्थित केला आहे. या सोबतच विद्यमान प्राचार्यांसंदर्भातील विषयांची मालिका न्याती यांनी विद्यापीठ प्रशासनासमोर सादर केली आहे. या संपूर्ण प्रकरणात न्यायालयातही काही सामाजिक कार्यकर्त्यांनी धाव घेतली आहे.

.. अखेर चौकशी समिती

हे प्रकरण ‘सकाळ’ने उचलून धरल्यानंतर विद्यापीठास त्याची दखल घेणे भाग पडले आहे. कुलगुरू प्रा. व्ही. एल. माहेश्‍वरी, प्र- कुलगुरु प्रा. डॉ. एस. टी. इंगळे, कुलसचिव डॉ. विनोद पाटील यांनी यासंदर्भात चौकशी समिती नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. येत्या आठवडाभरात या प्रकरणाशी संबंधित सर्व बाबींचा तपास करून ही तीन सदस्यीय समिती अहवाल सादर करेल. त्यातील तथ्ये व शिफारसींनुसार पुढील योग्य तो निर्णय घेतला जाणार आहे.

"कोटेचा महाविद्यालयातील प्राचार्य नियुक्तीच्या प्रक्रियेबाबत त्यांनी जाहिरात प्रसिद्धीसाठी मंजुरी मागितली होती. ती विद्यापीठाने संस्थेला दिली आहे. मात्र, काही नियमबाह्य होत असेल तर त्याची आम्ही दखल घेऊ. या प्रकरणाच्या चौकशीसाठी समिती नियुक्त करण्यात आली आहे."- प्रा. डॉ. एस. टी. इंगळे प्र- कुलगुरू, उमवि.

KBCNMU
Jalgaon News : केंद्राच्या योजनांतून महिलांची आर्थिक उन्नती; खासदार उन्मेष पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com