महिलांमध्येही रुजतेय फिटनेसची क्रेझ

अत्याधुनिक जीमकडे कल : आरोग्याबाबत जागरूकता वाढल्याचा परिणाम
Fitness
FitnessSakal

नांदेड : स्पर्धेच्या युगात धावपळ आणि ताणतणाव वाढत आहे. त्यामुळे आरोग्याकडे (Health) फारसे लक्ष दिले जात नाही. परिणामी, वजन वाढणे (Weight gain), स्थूलता अशा विविध समस्या उद्भवतात. यावर नियंत्रण मिळवून शरीर सुदृढ (Strengthen body)आणि तंदुरुस्त ठेवण्यासाठी महिलांमध्ये जिममध्ये (Women's Gym) व्यायाम करण्याकडे, तसेच योगाचे प्रशिक्षण घेण्याकडे कल वाढत आहे. यात चाळीशीवरील महिलाही मागे नाहीत. त्यातच हिवाळ्याचे दिवस असल्याने पोषक वातावरणात जिममध्ये व्यायाम करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

Fitness
मणिपूरच्या दारात दिल्ली आली : मोदी

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येकजण आता आपल्या आरोग्याबाबत जागरुक झाला आहे. हिवाळ्यात व्यायाम करणे फायदेशीर असल्याने तरुणी, महिलांची फिट अॅंड फाइन राहण्यासाठी जिममध्ये सकाळी पाच ते आठ व सायंकाळी सहा ते आठ या वेळेत वाढ झाली आहे. थंडीच्या दिवसात केलेला व्यायाम शरीराला पोषक असतो तर आहार पचवण्याची क्षमता वाढलेली असते. यामुळे या दिवसात पारंपरिक व्यायामशाळांबरोबरच अत्याधुनिक जिममध्ये व्यायाम करण्यासाठी जाणाऱ्यांचे प्रमाण वाढू लागले आहे. एकंदरीतच तरुणी व महिला आपल्या व्यक्तिमत्वासोबतच तंदुरुस्त राहण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत.

चाळीशीवरील महिला जिमकडे

वयोमानानुसार चाळीशीनंतर महिलांची शारीरिक तंदुरुस्ती कमी होत असते. तसेच विविध आजारदेखील बळावत असल्याने चाळीशीनंतर महिला केवळ माॅर्निंग व इव्हिनिंग वाॅक एवढाच व्यायाम होता. आता जिममध्ये या महिला पुरुषांसाठी त्यांच्या वयानुसार व्यायामाचा प्रकार, अत्याधुनिक इंजुरी फ्री मशिन असल्याने जिममध्ये चाळिशीवरील महिलांची संख्या वाढत असल्याचे जिम चालक सांगतात.

Fitness
नागपूर : ज्याची भीती तेच पुढ्यात! मायलेकाला ओमिक्रॉनची बाधा

शहरात महिलांसाठी सात जीम

शहरामध्ये महिलांसाठी सुमारे सात जिम आहेत. यात वेटलाॅस, वेटगेन, बाॅडी बिल्डिंग व जनरल फिटनेस, झुंबा, अॅरोबिक्स आदी व्यायाम प्रकारच्या सुविधा आहेत. सर्वसामान्य जिममध्ये दोनशे ते सहाशे रुपये शुल्क तर अत्याधुनिक जिममध्ये वार्षिक दहा ते २२ हजार रुपयांपर्यंतचे पॅकेजनुसार शुल्क आकारले जाते.

'किचन रुममध्येही आता आधुनिक यंत्रांनी जागा बळकावल्याने महिलांना फारसे श्रम करावे लागत नाही. त्यामुळे स्त्रियांमध्ये लठ्ठपणासह विविध आजारांचे प्रमाण वाढले आहे. त्यातच नोकरदार महिलांना ताणतणावामध्ये राहावे लागत असल्याने शारिरिक तंदुरुस्तीसाठी जिम, झुंबा, अॅरोबिक्सच्या माध्यमातून फिटनेस कायम राखण्यावर महिलांचा कल वाढला आहे. वेट लाॅस्ट, फॅट गो साठी महिला जास्त लक्ष देताना दिसत आहे.'

- प्रमोद लोखंडे, फिटनेस ट्रेनर, नांदेड

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com