Ram Lalla Pran Pratishtha : हिंदू अस्मितेचा हुंकार अखेर निनादला..!

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून १९८६ पासून राममंदिर आंदोलनानिमित्त देशभरात कार्यक्रम सुरू झाले होते.
Ayodhya Ram Mandir
Ayodhya Ram Mandiresakal

"सुमारे पाचशे वर्षांच्या रक्तरंजित आणि न्यायालयीन कायदेशीर लढाईनंतर सोमवारी, २२ जानेवारी २०२४ ला अयोध्येत प्रभू श्रीरामाच्या भव्य मंदिरात रामलल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होत आहे. जगभरातील हिंदूंसाठी हा दिवस ऐतिहासिक आहे. कारण या दिवशी तमाम हिंदूंच्या अस्मितेचा हुंकार संपूर्ण जगात निनादणार आहे."- उदय भालेराव, जळगाव (कारसेवक)

(latest marathi article by karsevak uday bhalerao on Ram Lalla Pran Pratishtha pride of Hindu identity come true jalgaon)

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या पुढाकाराने विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून १९८६ पासून राममंदिर आंदोलनानिमित्त देशभरात कार्यक्रम सुरू झाले होते.

१९८९ मध्ये अयोध्येत श्रीराम मंदिराचा शिलान्यास झाल्यानंतर विश्व हिंदू परिषदेतर्फे प्रत्येक गावात तसेच मोठ्या शहरातील प्रत्येक मंदिरात, प्रत्येक चौका-चौकांत रामशिला पूजन, राम पादुकापूजन, रामज्योत दिवाळी अशाप्रकारचे कार्यक्रम घेऊन त्यात हिंदू समाजातील प्रत्येक घटकांना सहभागी करून घेतल्याने अयोध्या राममंदिर आंदोलनाला विराट हिंदू चळवळीचे स्वरूप प्राप्त झाले.

१९८९ मध्ये देशभर ‘श्रीराम विजय’ यात्रा काढण्यात आल्या. त्या वर्षीची दिवाळी ‘राम दिवाळी’ म्हणून साजरी करण्याचे आवाहन केले गेले. साध्वी उमाभारती, साध्वी ऋतुंभरा, आचार्य धर्मेंद्रजी यांच्या आवेशपूर्ण आणि हिंदूंचे रक्त सळसळणाऱ्या ओजस्वी भाषणांनी सर्वत्र वातावरण ढवळून निघाले होते.

देवोत्थान एकादशीचा दिवस

त्यातच विश्व हिंदू परिषदेच्या धर्म संसदेने ३० ऑक्टोबर १९९० ला देवोत्थान एकादशी हा दिवस अयोध्येत कारसेवेसाठी निश्चित करून रामभक्तांना अयोध्येत येण्याचे आवाहन केले.

भाजपने श्रीराम मंदिराच्या आंदोलनाला जाहीर पाठिंबा देत तत्कालीन राष्ट्रीय अध्यक्ष लालकृष्ण अडवानी यांनी सोमनाथ ते अयोध्या अशी रथयात्रा सुरू केली.

देशभरातून लाखोंच्या संख्येने कारसेवकांनी अयोध्येकडे कूच केले. मात्र उत्तर प्रदेशचे तत्कालीन मुख्यमंत्री मुलायमसिंह यादव यांनी कारसेवा होऊ न देण्याचा निर्धार केला होता. ‘अयोध्या में पंछी भी पर नहीं मार सकेगा’ हे मुलायमसिंह यांचे दर्पोक्तीपूर्ण उद्‌गार!

अयोध्येकडे जाणाऱ्या रेल्वेगाड्यांमधून कारसेवकांना बळजबरीने उतरवून अटक करून मारहाण करत तुरुंगात डांबून ठेवले गेले. तरीही वेगवेगळ्या पद्धतीने गनिमीकाव्याने हजारो कारसेवक अयोध्येत पोचले आणि वादग्रस्त वास्तूवर चाल केली.

त्या वेळी मुलायमसिंह सरकारने कारसेवकांवर बेछूट गोळीबार केला, अनन्वित अत्याचार केले. यात अनेक कारसेवक मृत्युमुखी पडले!

Ayodhya Ram Mandir
Ram Lalla Pran Pratishtha: बॉलीवूडमधील कोणत्या सेलिब्रेटींना राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले नाहीच!

...अन्‌ उत्तर प्रदेशात भाजप सत्तेवर

देशातील राजकारण ढवळून निघाले. याचा परिणाम म्हणून नजीकच्या काळात उत्तर प्रदेशात झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपला बहुमत मिळून कल्याणसिंह मुख्यमंत्री झाले.

त्यानंतर पुन्हा एकदा विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून धर्म संसदेने ६ डिसेंबर १९९२ ही तारीख राममंदिराच्या कारसेवेसाठी निश्‍चित केली व रामभक्तांना कारसेवेसाठी अयोध्येत येण्याचे आवाहन केले.

६ डिसेंबरला कारसेवा होणार म्हणजे नक्की काय करायचं, ते कुणालाच माहीत नव्हते. वादग्रस्त वास्तू काही मीटरवर उभारलेल्या भव्य व्यासपीठावर विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष अशोक सिंघल, साध्वी उमा भारती, साध्वी ऋतुंभरा, आचार्य धर्मेंद्रजी, भाजप नेते लालकृष्ण अडवानी, डॉ. मुरली मनोहर जोशी आदींची भाषणे सुरू होती.

उमा भारती यांचे भाषण सुरू असतानाच अचानक कारसेवकांचा मोठा जत्था सुरक्षारक्षकांचे कडे भेदून वादग्रस्त वास्तूचे लोखंडी बॅरिकेड्स तोडून त्या ढाच्यावर चाल करून गेला. पाहता पाहता शेकडो, हजारो, लाखो कारसेवक विवादास्पद ढाचा उद्‌ध्वस्त करण्यासाठी भिडले.

सायंकाळी पाचच्या सुमारास संपूर्ण वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त झाली. त्यानंतर सुमारे ३२ वर्षांची न्यायालयीन, कायदेशीर लढाई उच्च न्यायालयात आणि सर्वोच्च न्यायालयात सुरू होती.

मंदिर उभारणीची प्रक्रिया

सर्वोच्च न्यायालयाने २०२० मध्ये रामजन्मभूमीवर मंदिर उभारणीसाठी आवश्यक असलेला अनुकूल निर्णय दिल्यानंतर मंदिर बांधकामाला गती मिळाली व सरकारकडून एक रुपयासुद्धा न घेता जनतेकडूनच निधी संकलनाचे अभियान देशभर सुनियोजित पद्धतीने राबविले गेले. प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा दिवस अन् मुहूर्तही निश्चित झाला.

अयोध्या श्रीराम मंदिर निर्माण ट्रस्टच्या पुढाकारातून आणि विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून देशातील सकल हिंदू समाजाला सोबत घेऊन, प्रत्येक घरात जाऊन प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या नियंत्रणाच्या अक्षता आणि निमंत्रणपत्रिका वितरणाचे कामही अत्यंत आखीवरेखीव पद्धतीने सूक्ष्म नियोजनाने संपूर्ण देशभरात सुरू केले. पुन्हा एकदा देशातील वातावरण राममय झालेले दिसून येत आहे.

२२ जानेवारीला प्राणप्रतिष्ठा होऊ नये, यासाठी तमाम विरोधकांचा सुरू असलेला प्रचंड आटापिटा विरुद्ध देशातील आणि परदेशातीलही एकवटलेल्या आणि ‘जय श्रीराम’ या शब्दाने भारावलेल्या, आत्मभान जागृत झालेल्या सकल हिंदू मनाचा हुंकार पुन्हा एकदा संपूर्ण देशात ऐकू येत आहे. मात्र त्यासाठी आवश्यकता आहे ‘डोळे अन् कान उघडे ठेवण्याची’

Ayodhya Ram Mandir
Ram Lalla Pran Pratishtha : येवल्यात कारसेवकांचा गौरव; रामभजन संध्येत रामभक्त मंत्रमुग्ध

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com