
जळगाव : मध्य रेल्वे भुसावळ विभागाच्या पाचोरा स्टेशन यार्ड रिमॉडेलिंग कामामुळे भुसावळ- इगतपुरी मेमू, सेवाग्राम, अमरावती मुंबई, नागपूर- पुणे गाड्या १४ आणि १५ ऑगस्ट २०२२ रोजी बंद राहणार आहे. यामुळे प्रवाशांनी गाड्याची उपलब्धता पाहून प्रवास करण्याच्या सूचना आहेत. (Latest Marathi News)
रेल्वे गाडी क्रमांक १२११२ अमरावती- मुंबई प्रतिनिधी एक्स्प्रेस १४ ऑगस्ट रोजी तिच्या मूळ स्थानकावरून पूर्णपणे रद्द राहील. त्या बदल्यात, १२१११ मुंबई- अमरावती १५ ऑगस्ट रोजी त्याच्या मूळ स्थानकापासून पूर्णपणे रद्द राहील.
१२१३६ नागपूर- पुणे त्रि-साप्ताहिक एक्स्प्रेस १३ ऑगस्ट रोजी तिच्या मूळ स्थानकावरून पूर्णपणे रद्द राहील. त्या बदल्यात, १२१३५ पुणे नागपूर त्रि-साप्ताहिक एक्स्प्रेस १४ ऑगस्ट रोजी त्याच्या मूळ स्थानकावरून पूर्णपणे रद्द राहील.
१११२० भुसावळ- इगतपुरी मेमू १४ आणि १५ ऑगस्ट रोजी पूर्णपणे रद्द राहील, तर ११११९ इगतपुरी- भुसावळ मेमू १५ आणि १६ ऑगस्ट रोजी धावणार नाही.
१२१४० नागपूर- मुंबई सेवाग्राम प्रतिनिधी एक्स्प्रेस १४ ऑगस्ट रोजी तिच्या मूळ स्थानकावरून पूर्णपणे रद्द राहील. १२१३९ मुंबई नागपूर सेवाग्राम प्रतिनिधी एक्स्प्रेस १५ ऑगस्ट रोजी त्याच्या मूळ स्थानकावरून पूर्णपणे रद्द राहील.
काही नियंत्रित सुरू राहणार
भुसावळच्या दिशेने जाणाऱ्या डाऊन गाड्या १२६२७ बेंगळुरू- नवी दिल्ली कर्नाटक एक्स्प्रेस एक तास १० मिनिटे, ११०५५ लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर गोदान एक्स्प्रेस एक तास १० मिनिटे, १२७१५ नांदेड- अमृतसर सचखंड एक्स्प्रेस २० मिनिटे, ११०६१ लोकमान्य टिळक टर्मिनस गोरखपूर- गोदान एक्स्प्रेस २० मिनिटे उशिराने धावतील.
भुसावळ ते मनमाडपर्यंतच्या गाड्या २२४५६ कालका- साईनगर शिर्डी द्वि-साप्ताहिक एक्स्प्रेस २ तास १५ मिनिटे, २२५१२ कामाख्या लोकमान्य टिळक टर्मिनस ए.सी. साप्ताहिक एक्स्प्रेस २ तास १० मिनिटे, १२१०८ सीतापूर लोकमान्य टिळक टर्मिनस २ तास, ११०७२ बनारस लोकमान्यतिलक टर्मिनस कामायनी एक्स्प्रेस २ तास, ११०५८ अमृतसर मुंबई एक्स्प्रेस ५० मिनीटे, २२५३७ गोरखपूर लोकमान्य टिळक टी एक्स्प्रेस २५ मिनिटे वेळ नियंत्रित करून चालवली जाईल, असे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.