Jalgaon News : बिबट्याचा धुमाकूळ; बंदिस्त कुंपणातून वासरू नेले ओढून

Leopard News
Leopard Newsesakal

मेहुणबारे : वरखेडे, लांबे वडगाव परिसरात बिबट्याकडून पशुधनांवर हल्ले झाल्याच्या घटना ताज्या असताना आता पळासरे येथेही बिबट्याने शेतात तारेच्या कुंपणाने वेढलेल्या बंदिस्त जागेतून नुकतेच एक वासरू ओढून नेले. या वासराचा अद्याप शोध लागलेला नाही. त्यामुळे परिसरातील शेतकरी भयभीत झाले आहेत.

बिबट्यांकडून पशुधनांवर हल्ले सुरूच आहेत. त्यामुळे तालुक्यात बिबटे आहेत तरी किती? असा सवाल निर्माण झाला आहे. वन विभागाकडून देखील बिबट्यांबाबत पुरेशी माहिती दिली जात नसल्याने नागरिक भयभीत झाले आहेत. (Leopard Attack Calf dragged through enclosed fence Jalgaon News)

हेही वाचा : क्रेडिट कार्ड वापरताय...मग या गोष्टी माहिती हव्याच....

Leopard News
SAKAL Impact News : उद्यान दुरूस्तीच्या हालचालींना वेग; समस्या सोडविण्यास सुरवात

पळासरे (ता. चाळीसगाव) येथील ज्ञानेश्वर रोहिदास गवारे यांचे पळासरे शिवारातील शेतात बंदिस्त तारेच्या कुंपणात गुरे बांधलेली असतात. दोन दिवसांपूर्वी बिबट्याने तारेच्या कुंपणात प्रवेश करून वासराचे दोर तोडून ओढून नेले.

दुसऱ्या दिवशी शेतकरी शेतात गेल्यावर हा प्रकार उघडकीस आला. शेतकऱ्याने या घटनेची महिती वन विभागाला दिल्यानंतर अधिकारी व कर्मचाऱ्यांनी धाव घेतली. मात्र जोपर्यंत वासरू सापडत नाही, तोपर्यंत पंचनामा शक्य नसल्याची भूमिका वन विभागाने घेतली आहे.

या घटनेने पळासरे भागात शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. या भागात अधूनमधून बिबट्याचे दर्शन होत असते, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.

Leopard News
Nashik News : कलगी-तुरा मधील ‘झिलक्या’ पात्र साकारणारे यशवंत बाबा; वयाच्या सत्तरीत आवाज खणखणीत!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com