Latest Marathi News | अपघातात जखमी रुग्णाला 3 शस्त्रक्रियांद्वारे जीवदान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Dr Jaiprakash Ramanand and colleagues discharging Sriram Barela after three surgeries

Health news : अपघातात जखमी रुग्णाला 3 शस्त्रक्रियांद्वारे जीवनदान

जळगाव : अपघात झाल्याने गंभीर होऊन अतिदक्षता विभागात दाखल असलेल्या रुग्णाला शस्त्रक्रिया करून मृत्यूच्या दाढेतून परत आणण्यात अस्थिव्यंगोपचार विभागाला वैद्यकीय कौशल्याच्या बळावर शक्य झाले आहे.

धानोरा (ता. चोपडा) येथील श्रीराम रूपसिंग बारेला मूळ मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. अपघात झाल्यामुळे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आले. अस्थिव्यंगोपचार विभागाच्या वैद्यकीय पथकाने तपासणी केली असता, त्याच्या डाव्या खुब्याला जबर मार लागलेला होता.

खुबा निखळून मोठ्या टिचा पडलेल्या होत्या. तसेच उजव्या गुडघ्याच्या हाडालादेखील मार होता. त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेण्यात आला. चार दिवस अतिदक्षता विभागात यशस्वी उपचार झाल्यावर त्याला साधारण वॉर्डात दाखल करण्यात आले होते.(Dr Jaiprakash Ramanand and colleagues discharging Sriram Barela after three surgeries Jalgaon news pvc99)

हेही वाचा: Jalgaon : दहा हजारांच्या वसुलीवरुन मित्रानेच सौरभचा गळा चिरला!

श्रीराम बारेलावर खुब्याच्या दोन, तर उजव्या गुडघ्याची एक अशी तीन शस्त्रक्रिया करून खुबा वाचविण्यात वैद्यकीय पथकाला यश आले. या रुग्णाकडे सरकारी कागदपत्रे मिळत नव्हती, मात्र त्याच्यावर उपचार पूर्ण करून पूर्ववत करण्याचे यशस्वी प्रयत्न करण्यात आले.

अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांच्या उपस्थितीत त्याला रुग्णालयातून निरोप देण्यात आला. अस्थिरोग विभागप्रमुख डॉ. योगेश गांगुर्डे, डॉ. राजेंद्र अग्रवाल, डॉ. योगेंद्र नेहेते, डॉ. पंकज घोगरे, डॉ. शंतनू भारद्वाज, डॉ. महेश देशमुख, डॉ. आसिफ कुरेशी, डॉ. गोपाळ डव्हळे, डॉ. प्रणव समरूतवर, डॉ. सचिन वाहेकर यांच्यासह बधिरीकरण विभागाचे डॉ. संदीप पटेल, डॉ. अनिल पाटील, डॉ. ऋतुराज काकड, अधिपरिचारिका नीला जोशी, रूपेश कासार आदींनी उपचारासाठी सहकार्य केले.

हेही वाचा: Crime News : पतीशी भांडणानंतर घर सोडलेल्या पीडितेवर बिहारमध्ये अत्याचार