Jalgaon News: वीज कोसळून पशुधन हिरावले; वर्ष उलटूनही मदतीची प्रतीक्षा

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
Swabhimani-Shetkari-Sanghatana
Swabhimani-Shetkari-Sanghatanaesakal

Jalgaon News : सातोड (ता. मुक्ताईनगर) येथील कमलबाई रामचंद्र मुंढे यांचा वर्षभरापूर्वी वीज कोसळून एक बैल व एक गोऱ्हा मृत्युमुखी पडला होता. याबाबत जाबजबाब नोंदवून पंचनामा शासनाकडे सादर झाला होता.

मात्र, वर्ष होऊनही शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. त्यामुळे ‘प्रशासकीय काम आणि सहा महिने थांब’ची प्रचिती शेतकऱ्यांना येत असून मदतीची प्रतीक्षा होत आहे. (Livestock lost due to lightning Waiting for help from year Swabhimani Shektari Sangathan statement to District Collector Jalgaon News)

या संदर्भात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे डॉ. विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे, की वर्षभरापूर्वी ऑगस्ट महिन्यामध्ये मुसळधार पावसात वीज कोसळून एक बैल व एक गोऱ्हा असे पशुधन त्यांच्या झोपडीजवळ मृत्युमुखी पडले होते.

तसा तत्काळ पंचानामा तलाठ्यांनी करून अहवाल जिल्हाधिकारी टंचाई शाखा यांच्याकडे सुपूर्त केला होता. परंतु या दुर्घटनेला जवळपास एक वर्ष उलटूनही या पीडित शेतकऱ्याला कोणतीही मदत आजतागायत मिळाली नाही.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Swabhimani-Shetkari-Sanghatana
Nashik: अंजनेरी-ब्रह्मगिरी रोप-वे स्थलांतरणविषयी नाशिकच्या खासदारांना भेटा; संदीप भानोसेंना गडकरींची सूचना

हा शेतकरी वारंवार राजकीय नेत्यांच्या पायऱ्या झिजवत आहे. परंतु राजकीय नेते आज मदत मिळेल, उद्या मदत मिळेल, असे गाजर दाखवून पीडित शेतकऱ्याला फिरवत आहेत. हा शेतकरी कोरडवाहू अल्पभूधारक असल्यामुळे त्याला त्याच्या मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाची मदत पुन्हा फुलाची पाकळी म्हणून या हंगामात पेरणीसाठी उपयोगात पडेल, अशी अपेक्षा होती.

परंतु निगरगठ्ठ प्रशासन व उदासीन राजकीय धोरणामुळे सदर पीडित शेतकरी मागील एक वर्षांपासून मदतीपासून वंचित आहे. पीडित शेतकऱ्याला त्याच्या मृत्युमुखी पडलेल्या पशुधनाची मदत तत्काळ न मिळाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असे डॉ. सोनवणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे म्हटले आहे.

Swabhimani-Shetkari-Sanghatana
Nashik News: पाथर्डीतील नववसाहतींना रस्त्यांची प्रतिक्षा! पावसाळ्यामुळे नागरिकांचे अतोनात हाल

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com