
Jalgaon Crime News : पाचोऱ्यात बंद घर फोडले; 68 हजारांचा ऐवज लंपास
पाचोरा (जि. जळगाव) : येथील गिरणा पंपिंग रस्त्यावरील साई पार्कमधील बंद असलेले घर फोडून चोरट्यांनी ६८ हजार २०० रुपयांचा ऐवज लंपास केला. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. (Locked house broken in Pachora 68 thousand stolen Jalgaon Crime News)
हेही वाचा : संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...
हेही वाचा: Nashik News : नगराध्यक्ष ते उपमुख्यमंत्री घडविणारी ऐतिहासिक रंगारवाडा शाळा कालबाह्य!
साई पार्कमधील संदीप परदेशी यांच्या मालकीच्या घरात येथील एका स्थानिक बँकेचे व्यवस्थापक पंकज चौधरी गेल्या दीड वर्षांपासून भाडे तत्त्वावर वास्तव्यास आहेत. ते चार-पाच दिवसांपासून शिंदखेडा या आपल्या मूळ गावी परिवारासह गेल्याने घर बंद होते. चोरट्यांनी १३ ला रात्री बंद घराचा दरवाजा तोडून घरात प्रवेश केला. कपाटातून सोने- चांदीचे ६८ हजार २०० रुपये किमतीचे दागिने लांबवले.
१४ ला सकाळी घर उघडे असल्याचे शेजाऱ्यांना कळताच त्यांनी पंकज चौधरी यांना माहिती दिली. ते लगबगीने परतल्यानंतर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले. चोरी गेलेल्या ऐवजात प्रत्येकी ५ ग्रॅम सोन्याचे टोंगल व काप, ३ ग्रॅमच्या बाळ्या, ७ ग्रॅमचे पेंडल, २ ग्रॅमची अंगठी, २ ग्रॅम सोन्याचे दागिने, १ हजाराची चांदीची अंगठी असा ऐवज असून, पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिस निरीक्षक प्रताप इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक नरेंद्र शिंदे तपास करीत आहेत.
हेही वाचा: Dhule Crime News : वाहनांची चोरी करणाऱ्या चोरट्याला LCBने ठोकल्या बेड्या; बनावट चावीने करायचा हातसफाई