Dhule Crime News : वाहनांची चोरी करणाऱ्या चोरट्याला LCBने ठोकल्या बेड्या; बनावट चावीने करायचा हातसफाई

crime news
crime newsesakal

धुळे : बनावट चावीने पिकअप गाड्या चोरणाऱ्या टोळीतील दोघांपैकी एकाला स्थानिक गुन्हा शाखेने पाठलाग करून पकडले. त्याच्याकडून चोरीची चार लाखांची दोन वाहने जप्त केली. वाहनचोर मालेगाव येथील आहेत.

crime news
Crime News : तरुणाकडून ‘एटीएम’ची अदलाबदल; बँक खात्यातून लांबवले ९० हजार रुपये

धुळे शहरातील चाळीसगाव रोडवरील एका हॉटेलपुढे दोनजण दोन पिकअप वाहने घेऊन उभे असल्याची व ती वाहने चोरीची असल्याची माहिती स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार पोलिस निरीक्षक श्री. पाटील व पथकाने सोमवारी (ता.१२) रात्री नऊच्या सुमारास छापा टाकला.

हेही वाचा: संयुक्त नावावरील गृहकर्जातून होईल प्राप्तीकराची बचत...

पोलिसांना पाहून दोघांनी तेथून पळ काढला. त्यातील एकजण निसटला. मात्र, दुसरा पोलिसांच्या तावडीत सापडला. इम्रान शाह गफ्फार शाह (रा. विजयनगर, कुसुंबा रोड, मालेगाव) असे त्याने नाव सांगितले. फरार संशयिताचे नाव अफसर शाह सलीम शाह (रा. स्विमिंग पुलाजवळ, दरेगाव रोड, मालेगाव) असल्याचे इम्रानने सांगितले. बनावट चावीच्या मदतीने वाहनचोरी केल्याची कबुली त्याने दिली.

crime news
Crime News : पित्यानेच रचला मुलाच्या अपहरणाचा कट

पिकअप गाडी (एमएच-४८/टी-१६३७) सात-आठ दिवसांपूर्वी हुडको कॉलनी (मालेगाव) येथून तर विनाक्रमांकाची पिकअप वाहन दोन महिन्यांपूर्वी मालेगाव येथील यासीन मशिदीजवळून अफसर शाह व त्याच्या दोन साथीदारांनी चोरी केल्याचे कबूल केले. पोलिसांनी चार लाखांची वाहने ताब्यात घेतली. इम्रानला पुढील तपासासाठी मालेगाव शहर पोलिस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले.

crime news
Crime News : पोलीस असल्याची बतावणी; सव्वादोन तोळे वजनाची सोन्याची चैन लांबवली

पोलिस अधीक्षक संजय बारकुंड, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील, योगेश राऊत, संजय पाटील, रफिक पठाण, प्रभाकर बैसाणे, श्रीकांत पाटील, योगेश चव्हाण, राहुल सानप, योगेश जगताप, किशोर पाटील, सुनील चव्हाण, श्रीशैल जाधव, कैलास महाजन, राजू गिते यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com