Jalgaon News : चाळीसगावला आजपासून महाशिवपुराण कथा

आंतरराष्ट्रीय कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेचा कार्यक्रम होत आहे. या कथेसाठी बाहेरगावहून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले
Pradeep Mishra
Pradeep Mishraesakal

Jalgaon News : शहरात उद्यापासून (ता. १६) आंतरराष्ट्रीय कथा वाचक पंडित प्रदीप मिश्रा यांच्या महाशिवपुराण कथेचा कार्यक्रम होत आहे. या कथेसाठी बाहेरगावहून मोठ्या संख्येने भाविक दाखल झाले आहेत.

या कार्यक्रमाची जय्यत तयारी करून योग्य नियोजन करण्यात आले असून या आध्यात्मिक सोहळ्याचा भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन खासदार उन्मेष पाटील यांनी केले. (Maha Shiv Puran story from today to Chalisgaon jalgaon news)

या कथा कार्यक्रमाच्या संदर्भात माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत खासदार उन्मेष पाटील यांनी नियोजनाची माहिती दिली.

यावेळी अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलिस अधिकारी अभयसिंह देशमुख, प्रांताधिकारी प्रमोद हिले, पोलिस निरीक्षक संदीप पाटील, वाहतूक शाखेचे सहाय्यक निरीक्षक तुषार देवरे, भाजपचे के. बी. साळुंखे, राजेंद्र चौधरी, घृष्णेश्‍वर पाटील, दिनेश बोरसे, मधुकर काटे आदी उपस्थित होते.

सुरवातीला अप्पर पोलिस अधीक्षक रमेश चोपडे यांनी २० जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या कार्यक्रमानिमित्ताने वाहतूक व्यवस्था व बंदोबस्ताच्या दृष्टीने पोलिस प्रशासनाने केलेल्या नियोजनाची माहिती दिली.

Pradeep Mishra
Jalgaon News : रायसोनी महाविद्यालयात ‘उडी उडी जायें...’! पतंग महोत्सव रंगला

खासदार पाटील यांनी सांगितले, की भाविकांची कुठल्याही प्रकारे गैरसोय नाही यादृष्टीने सुक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.

गर्दी वाढल्यास, अतिरिक्त बारा एकरवर एलईडी स्क्रिनची देखील स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. सात एकर जागेवर महाप्रसादाचा लाभ भाविकांना घेता येईल. कथास्थळी शुद्ध पिण्याचे पाणी, आरोग्याच्या सोयी, स्वच्छतेच्या सुविधा आदी सर्व सेवा उपलब्ध राहणार आहेत.

हा कार्यक्रम चाळीसगावकरांसाठी पर्वणी असून अनेक भाविक वेगवेगळ्या माध्यमातून सेवेसाठी पुढे आले असल्याचे त्यांनी सांगितले.

Pradeep Mishra
Jalgaon News | महाशिवपुराण चैतन्याचे अमूर्त रूप : हभप मोरदे महाराज

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com