Why are electric vehicles becoming popular in Maharashtra?
esakal
जळगाव : राज्यात इलेक्ट्रिक वाहनांची (ईव्ही) संख्या नऊ लाखांच्या पार गेली असून, शासकीय अनुदान, इंधन दरवाढ आणि सौर ऊर्जेमुळे मिळणाऱ्या शून्य वीज बिलामुळे नागरिक ई-वाहनांकडे वेगाने वळत आहेत. वाढत्या मागणीमुळे काही वाहनांसाठी ‘वेटिंग लिस्ट’ देखील आहे. चार्जिंग सुविधा सहज उपलब्ध झाल्यास ही पर्यावरणपूरक इ-वाहनांची संख्या आणखी वाढू (Benefits of electric vehicles in Maharashtra) शकते, असे चित्र आहे.