Maharashtra Politics : PSIपद हुकले अन् थेट मिळाले मंत्रिपद! शपथ घेताना आई करीत होती शेतात काम...

Anil Patil taking oath as Minister.
Anil Patil taking oath as Minister. esakal

Maharashtra Politics : राज्याच्या सत्तास्थापनेच्या घडामोडीत अमळनेर विधानसभा मतदारसंघाचे आमदार अनिल भाईदास पाटील यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. मतदारसंघाला पहिल्यांदाच मंत्रिपदाच्या रूपाने लाल दिवा मिळाला आहे. (maharashtra politics Amalner Constituency gets Ministership for first time jalgaon news)

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक आमदार शिंदे-फडणवीस सरकारच्या सत्तेत सहभागी झाले आहेत. पक्षाच्या नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली असून, यात खानदेशातून एकमेव अमळनेरचे आमदार अनिल पाटील यांना कॅबिनेट मंत्रिपद मिळाले आहे.

आमदार पाटील यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादीकडून विधानसभा निवडणूक लढवली आणि आमदार झाले. पक्षाने पुन्हा जबाबदारी देत मुख्य प्रतोदपदी त्यांची निवड केली. आता मंत्रिमंडळात त्यांना स्थान प्राप्त झाले आहे.

अजित पवारांचे कट्टर समर्थक

अनिल पाटील हे अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. त्यातच २०१९ च्या पहाटेच्या शपथविधीवेळी आमदार अनिल पाटील शेवटपर्यंत अजित पवार यांच्यासोबत होते. विधानसभा तसेच विधानभवनाबाहेरील आक्रमकपणामुळे आमदार अनिल पाटील यांचा मंत्रिपदाचा मार्ग अजून सुकर झाला.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

Anil Patil taking oath as Minister.
Ajit Pawar: राष्ट्रवादीच्या बंडामुळे काँग्रेसला काळजी विरोधी पक्षांच्या ऐक्याची; राजकीय फायद्यासाठी विचारमंथन

कार्यकर्ते मुंबईच्या दिशेने रवाना

आमदार पाटील यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांच्या अभिनंदनासाठी तसेच शक्तिप्रदर्शनासाठी अमळनेर विधानसभा मतदारसंघातून शेकडो कार्यकर्ते जिल्हा परिषद सदस्या जयश्री पाटील यांच्या नेतृत्वाखाली मुंबईच्या दिशेने रवाना झाले आहेत. शहरातही त्यांच्या समर्थनार्थ कार्यकर्त्यांनी पेढेवाटप केले.

येथील पक्ष कार्यालय व निवासस्थानाबाहेर जयश्री पाटील याच्यासमवेत कार्यकर्त्यांनी आतषबाजी करत तसेच ढोल-ताशांच्या गजरात जल्लोष केला. या वेळी शहर व तालुक्यातील अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

"मंत्रिपदाच्या माध्यमातून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मी कटिबद्ध असेल. पक्षाने माझ्यावर जो विश्वास टाकला, त्याला सार्थ ठरवून यापुढे खानदेशात पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करणार आहे." - अनिल पाटील, नवनिर्वाचित कॅबिनेट मंत्री

Anil Patil taking oath as Minister.
Maharashtra Politics: अजित पवारांपेक्षा 'या' व्यक्तीच्या निर्णयाने शरद पवार दु:खी

हुकलेले ‘पीएसआय’पद अन् नशिबातील मंत्रिपद

श्री. पाटील यांचे वडील भाईदास पाटील सार्वजनिक बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता होते. त्यांचे सिम्बायोसिस विद्यापीठात एमबीए आणि एलएलबीपर्यंत शिक्षण झाले आहे. एक गुण कमी मिळाल्यामुळे त्यांची पोलिस उपनिरीक्षक पदाची संधी हुकली. तेथून ते बांधकाम क्षेत्राकडे वळले. तेथे काम करीत असताना भाजपच्या माध्यमातून राजकारणाकडे वळले.

सर्वप्रथम २००२ ला कळमसरे डांगरी गटात व २००७ मध्ये अमळगाव, पातोंडा गटात जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. त्यांनतर दहा वर्षे ते बाजार समितीचे सभापती राहिले. दहा वर्षे जिल्हा बँकेचे संचालक होते. पुन्हा जिल्हा बँक आणि दूध संघावर ते निवडून आले. त्यांच्या पत्नी जयश्री पाटील २०१३ मध्ये नगराध्यक्ष झाल्या आणि नंतर २०१७ ला जिल्हा परिषद सदस्या झाल्या. त्यांनतर त्यांना २००९ व २०१४ मध्ये भाजपकडून विधानसभेची उमेदवारी मिळाली.

दोन्ही वेळा त्यांना पराभूत व्हावे लागले होते. त्यानंतर माजी आमदार साहेबराव पाटील यांच्यासोबत त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. २०१९ ला राष्ट्रवादीकडून ते विजयी झाले. अजित पवारांचे खंदे समर्थक म्हणून पहिल्यांदा पहाटेच्या शपथविधीला ते अजित पवारांसोबत गेले. पक्षाने त्यांच्यावर प्रतोद म्हणून जबाबदारी दिली. विरोधी पक्ष म्हणून प्रत्येक आंदोलनात त्यांनी मुख्य जबाबदारी पार पाडली. अनिल पाटील मंत्रिपदाची शपथ घेत होते, तेव्हा त्यांच्या आई पुष्पाबाई शेतात काम करीत होत्या.

Anil Patil taking oath as Minister.
Jalgaon Anil Patil : दंगली घडविण्याचे भाजपचे तंत्र : आमदार अनिल पाटील

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com