Jalgaon : ...तर महापालिकेत ‘खेला होबे’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Jalgaon Municipal Corporation

Jalgaon : ...तर महापालिकेत ‘खेला होबे’

जळगाव : राज्यातील महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) गुरुवारी (ता. ३०) मुंबईत विधीमंडळात (Legislature) विश्‍वासदर्शक ठराव होणार आहे. बंडखोर एकनाथ शिंदे (Eknath shinde) गट आपल्या मतावर ठाम आहेत. राज्यातील सरकार कोसळले, तर जळगाव महापालिकेतही (JMC) राजकारणाचा ठरलेला आहे ‘खेला होबे’! (Mahavikas Aghadi vote of confidence in Mumbai Legislature will affect on Jalgaon municipal corporation election News)

जळगाव महापालिकेत भारतीय जनता पक्षाची सत्ता होती. मात्र, शिवसेना नेतृत्वावर विश्‍वास ठेवत महापालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या २७ नगरसेवकांनी पक्ष सोडला आणि सत्तेसाठी शिवसेनेला पाठिंबा दिला. त्यामुळे महापालिकेत शिवसेनेची सत्ता आली आहे.

एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व

जळगाव महापालिकेत सत्तातंर करण्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी नेतृत्व केले होते. भाजपचे नगरसेवक फुटले, त्यावेळी त्यांना थेट एकनाथ शिंदे यांच्याकडे नेण्यात आले. त्यांनी या फुटीर नगरसेवकांच्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय केल्याचे सांगण्यात आले. महापौर व उपमहापौर निवडणुकीच्या मतदानासाठी फुटीर नगरसेवक जळगावात आले आणि त्यांनी शिवसेनेला मतदान केले. त्यामुळे शिवसेनेचे महापौर झाले आणि महापालिकेवर भगवा फडकला.

अपात्रतेच्या सुनावणीची भीती

महापालिकेत शिवसेनेला साथ देणाऱ्या नगरसेवकांवर अपात्रतेची कारवाई करावी, अशी तक्रार भाजपने नाशिक विभागीय आयुक्ताकडे दिली आहे. त्यावर सुनावणी सुरू आहे. या सुनावणीकडे राज्याचे नगरविकामंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांचे लक्ष होते. त्यामुळे फुटीर नगरसेवकांना एक आशा होती. मात्र, आता एकनाथ शिंदे यांनीच शिवसेनेत बंडखोरी केली आहे. राज्यातील सत्तेत ते भाजपसोबत जाण्याच्या तयारीत आहेत. महाविकास आघाडी सरकार पडले, तर जळगाव महापालिकेतील फुटीर नगरसेवकांची पंचाईत होण्याची शक्यता आहे. शिंदे त्यांचे सर्व ऐकून घेत होते. त्यांना विकासासाठी निधीही देत होते. त्यामुळे फुटीर नगरसेवकांसमोर नेतृत्वाचा मोठा प्रश्‍न उभा राहणार आहे.

हेही वाचा: 'काय झाडी, काय डोंगार, काय हाटेल...' आता गाणंबी व्हायरल

शिंदेसोबत नगरसेवक जाणार?

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार पडले व भाजप व शिवसेना बंडखोरांचे सरकार आले, तर जळगाव महापालिकेतही मोठे बदल होण्याची शक्यता आहे. फुटीर नगरसेवक शिंदे गटासोबत जाण्याची शक्यता असल्याचेही सांगण्यात येत आहे. सध्या तरी याबाबत कोणीही बोलण्यास तयार नाही. मात्र, आपले नगरसेवक पद जाऊ नये, तसेच कारवाई झाल्यास पुढील निवडणूक लढण्यासही अपात्र होण्याचा धोका असल्यामुळे नगरसेवकही तडजोड करण्याची शक्यता आहे. शिवाय शिंदे यांचा शिवसेना गटच भाजपसोबत असल्यामुळे अपात्र करण्यासाठी तक्रार दाखल करणारी भाजप तक्रार मागे घेण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वच मार्ग सुकर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मुंबईतील विधीमंडळाच्या शक्तीप्रदर्शनासोबत जळगाव महापालिकेच्या राजकारणाकडे लक्ष असणार आहे.

हेही वाचा: शहरातून चोरी झालेल्या कारचा मालेगावच्या जबरी चोरीत वापर

Web Title: Mahavikas Aghadi Vote Of Confidence In Mumbai Legislature Will Affect On Jalgaon Municipal Corporation Election News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top