
जळगाव : शहरातील शिवकॉलनी स्टॉपसमोरील देशी दारूच्या अड्ड्यावर अक्षय चव्हाण (वय २३) या तरुणाचा खून करण्यात आला होता. खुनानंतर मारेकरी फरार झाले होते. गेल्या २४ तासांपासून संशयितांचा शोध सुरु असताना एमआयडीसी पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून चॉपर हल्ला करणारा नीलेश प्रवीण पवार ऊर्फ बाळा याला शिरसोलीच्या जंगलातून अटक करण्यात आली. (Main suspect in Shiv Colony murder arrested Jalgaon latest marathi news)
शैलेश सुभाष राठोड याने पोलिसांना दिलेल्या जबाबानुसार त्याने ओळखीचा मित्र अमरसिंग ओंकार चव्हाण (रा. नंदनवन कॉलनी) याचा लहान भाऊ प्रदीप चव्हाण याला मोबाईल वापरण्यास दिला होता. मात्र, त्याने तो खराब करून परत दिल्यावरून वाद झाला. भांडण होत असल्याने शैलेश याने अक्षय व युवराज जाधव अशांना फोन करून बोलावून घेतले.
यावेळी गणेश चव्हाण, अमरसिंग चव्हाण, नीलेश ऊर्फ बाळा पवार असे शैलेश याच्या सोबत वाद घालत असताना अक्षय आणि युवराज तिथे धडकले. भांडण सोडवत असताना अमरसिंग चव्हाण, नीलेश ऊर्फ बाळा पवार व त्याच्या सोबतचे २-३ मित्र अशांनी अक्षय चव्हाण याला चॉपरने भोसकून गंभीर जखमी केले, त्याला वाचवण्यासाठी आलेल्या युवराज जाधव यालाही पाठीत चॉपर मारुन जखमी करण्यात आले होते.
घडलेल्या घटनेनंतर तत्काळ हल्लेखोरांनी घटनास्थळावरून पळ काढला. मयताचा भाऊ शैलेश अजय चव्हाण याच्या तक्रारीवरून नीलेश ऊर्फ बाळ पवार (रा. रिंगरोड), अमरसिंग चव्हाण (वय ३०) या दोघांसह त्यांच्या साथीदारांविरुद्ध रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
संशयित लपला जंगलात
नीलेश ऊर्फ बाळा पवार हा मुळ कूसूंबे (ता. रावेर) येथील रहिवासी असून पोलिस पथके त्याच्या मागावर होती. एमआयडीसी पोलिस ठाण्याचे सहाय्यक फौजदार जितेंद्र राठोड यांना संशयितांची गुप्त माहिती मिळाली.
निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील सहाय्यक निरीक्षक अमोल मोरे, उपनिरीक्षक दीपक जगदाळे, गणेश देशमुख, सहायक फौजदार अतुल वंजारी, समाधान टहाकळे, शुद्धोधन ढवळे, इम्रान सैय्यद, किशोर पाटील, मुद्दसर काझी, जुबेर तडवी अशांच्या पथकाने शिरसोलीच्या जंगलात लपून बसलेला असताना नीलेश प्रवीण पवार ऊर्फ बाळा याला अटक केली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.