साजिथ शिवानंदन यांची डिस्नी प्लस हाॅटस्टारच्या प्रमुखपदी नियुक्ती | Sajith Sivanandan | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sajith Sivanandan

साजिथ शिवानंदन यांची डिस्नी प्लस हाॅटस्टारच्या प्रमुखपदी नियुक्ती

Sajith Sivanandan Head Of Disney Hotstar Plus : डिस्नीच्या इंटरनॅशनल कंटेंट अँड ऑपरेशन्स ग्रुपने मंगळवारी (ता.२३) साजिथ शिवानंदन यांची डिस्नी प्लस हाॅटस्टारच्या (Disney) कार्यकारी उपाध्यक्ष आणि प्रमुख म्हणून नियुक्तीची घोषणा केली आहे. गुगलमधून डिस्नी प्लस हाॅटस्टारमध्ये सामील होणारे शिवानंदन ऑक्टोबरपासून आपली नवीन भूमिका निभावणार आहेत. ते डिस्नी प्लस हाॅटस्टारच्या भारतीय विभागाचे काम पाहातील.

हेही वाचा: उर्फीने अक्षयच्या चित्रपटाची उडवली खिल्ली, म्हणाली, का प्रदर्शित झाला?

साजिथ शिवानंदन (Sajith Sivanandan) ऑक्टोबरमध्ये गुगलशी जोडले जातील. येथे ते एमडी आणि व्यावसायिक प्रमुख आहेत. ते नेटफ्लिक्सवर स्ट्रीमिंगच्या विकासासाठी रोडमॅप तयार करण्याची जबाबदारी बरोबरच भारतात डिस्नी प्लस हाॅटस्टारचे काम पाहातील.

हेही वाचा: अल्लु अर्जुनच्या पुष्पा २च्या चित्रीकरणाला सुरुवात? रश्मिकाने शेअर केला फोटो

दरम्यान 'द वाॅल्ट डिस्नी कंपनी'चे अध्यक्ष रेबेका कँपबेल म्हणाले, मला आनंद आहे की साजिथ आमच्या टीममध्ये सामील झाले आणि आता ते डिस्नी प्लस हाॅटस्टारच्या इनोव्हेटिव्ह टीमचे नेतृत्व करतील. या क्षेत्रात त्यांचा अनुभव आणि नेतृत्वाच्या माध्यमातून डिस्नी प्लस हाॅटस्टारला खूप फायदा होईल. (Entertainment News)

Web Title: Disney Appoints Sajith Sivanandan As Chief Of Hotstar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..