Jalgaon News : नरेंद्र नारखेडे यांच्या सहकार पॅनलला बहुमत

Election Result
Election Resultesakal

फैजपूर : येथील लक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्थेच्या आज झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत नरेंद्र नारखेडे यांचे सहकार पॅनल विजयी झाले. लक्ष्मी नागरी पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत आज शहरातील न्हावी दरवाजा जवळील जिल्हा परिषदेच्या मराठी शाळेत सकाळी आठ ते दुपारी चार या वेळात मतदान झाले.

त्यानंतर लगेचच मतमोजणी करण्यात आला. या निवडणुकीत ८७३ मतदारांपैकी ४४५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत नरेंद्र नारखेडे यांच्या नेतृत्वाखालील सहकार पॅनलला मतदारांनी स्पष्ट बहुमत दिले. सर्वसाधारणच्या सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात होते. (Majority for Narendra Narkhede cooperation panel Jalgaon News)

हेही वाचा : ज्ञानेश्वरीत आहेत HR निगडित व्यवस्थापन सूत्रे...

Election Result
Jalgaon News : चाळीसगावात अनोळखी तरुणाची आत्महत्या

यात विजयी उमेदवार असे (कंसात प्राप्त मते) ः विद्यमान चेअरमन नरेंद्र नारखेडे (४२१), मनोजकुमार पाटील (४१६), अनिल नारखेडे (४२५), निळकंठ सराफ (४१३), डॉ. गणेश चौधरी (३९८), प्राचार्य रवींद्र चौधरी (४१७) हे उमेदवार विजयी झाले. ‘ओबीसी’च्या एका जागेवर दोनपैकी अप्पा चौधरी हे ४१६ मते मिळवून विजयी झाले.

या जागेवरुन निवडणूक लढवणारे उमाकांत पाटील, जयप्रकाश चौधरी उमेदवार पराभूत झाले. महिलांच्या दोन जागा बिनविरोध झाल्या असून यात लतिका बोडे व रेवती पाटील यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून आर. डी. राऊत यांनी तर सहायक म्हणून एम. पी. भारंबे, केंद्र प्रमुख डी. जे. तडवी, मतदान अधिकारी डी. के. भारंबे, सतीश भंगाळे, प्रकाश झोपे, अंबादास मराठे, भागवत सपकाळे, विशाल भिरूड यांनी कामकाज पाहिले.

त्यांना संस्थेचे कर्मचारी जयश्री चौधरी, राजेंद्र मानेकर, चंद्रकांत पाटील, राजेंद्र मिस्त्री यांचे सहकार्य लाभले. दरम्यान, विजयी उमेदवारांचे महाराष्ट्र राज्य प्रयोगशाळा कर्मचारी महासंघाचे राज्य सचिव व भाजपच्या शिक्षक आघाडीचे अध्यक्ष सिद्धेश्वर वाघुळदे यांनी पुष्पहार घालून अभिनंदन केले.

Election Result
Jalgaon News : पाळधी ते मुक्ताई पायीदिंडीचे प्रस्थान

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com