Jalgaon News : मांडळ येथील खूनप्रकरणी संशयिताना पोलिस कोठडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Arrested News

Jalgaon News : मांडळ येथील खूनप्रकरणी संशयिताना पोलिस कोठडी

कळमसरे (ता. अमळनेर) : तालुक्यातील मांडळ येथे एका तरुणाला सहा जणांनी फावड्याने मारून व अंगावर ट्रॅक्टर चालविल्याने त्याचा मृत्यू झाल्याप्रकरणी मंगळवारी (ता. १७) गुन्हा दाखल झाला होता.

या प्रकरणी तीन संशयितांना अटक करून न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची कोठडी देण्यात आली तर इतर तीन संशयित फरार झाले असून, त्यांच्या शोधार्थ पोलिस पथक रवाना झाले आहे. (Mandal murder case Suspect in police custody Three absconder Search team sent Jalgaon News)

हेही वाचा: Nashik News : मार्चमध्ये रामवाडी पूल दरम्यान नदीपात्रात Boating! दोन्ही बाजूला जेट्टी तयार

मांडळ येथील जयवंत यशवंत कोळी (वय ३६) हा लौकी नाला परिसरात शेतात पाणी भरण्यासाठी गेला होता. त्याच्या शेताजवळील नाल्यालगत अवैध वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टरमध्ये वाळू भरत असल्याने जयवंत कोळी यांनी विरोध केल्याने त्यांना संशयित सहा जणांनी गुप्तांगावर फावड्याने मारहाण करीत त्यांच्या अंगावरून ट्रॅक्टर गेल्याने ते जबर जखमी झाले होते.

त्यांना तत्काळ धुळे येथे उपचारासाठी हलविले. मात्र काही वेळेतच त्यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान मृत जयवंतची पत्नी शुभांगी कोळी यांच्या फिर्यादीवरून मारवड पोलिस ठाण्यात सहा संशयितांनावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.यापैकी तीन जणांना मंगळवारीच मारवड पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

आर्थिक निर्णय घेताना बनू नका चिंतातूर जंतू....

हेही वाचा: Nashik News: अंमलदारासाठी आयुक्तांचे निरीक्षकांना अल्टिमेटम; कर्मचाऱ्यांअभावी पथके होईना कार्यान्वित!

यात सागर अशोक कोळी, गोलू उर्फ देविदास नरेश कोळी, रोहित बुधा पारधी यांना आज न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसाची पोलिस कोठडी देण्यात आली आहे. तर अशोक लखा कोळी, विशाल अशोक कोळी, विनोद अशोक कोळी, (सर्व रा. मांडळ) हे फरार आहेत. त्यांच्या शोधार्थ मारवड पोलिसांनी पथक रवाना केले आहेत.

हेही वाचा: Nashik News | वायुप्रदुषण नियंत्रणासाठी हवी नागरिकांची साथ : NMC आयुक्‍त डॉ.पुलकुंडवार