esakal | मध्यप्रदेशात भीषण स्थिती..कोरोना रुग्णांची जळगावकडे धाव
sakal

बोलून बातमी शोधा

corona testing

मध्यप्रदेशात भीषण स्थिती..कोरोना रुग्णांची जळगावकडे धाव

sakal_logo
By
सचिन जोशीजळगाव : गेल्या महिन्यात जिल्ह्यात रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असताना बेड अपूर्ण पडू लागल्याने रुग्ण सीमेलगत असलेल्या मध्यप्रदेशातील (madhya pradesh) शहरांमध्ये जाऊन हॉस्पिटलमध्ये (hospital) दाखल होत होते. महिनाभरात हेच चित्र उलटे फिरून आता मध्यप्रदेशातील रुग्ण ( corona patient) जळगावात (Jalgaon) दाखल होऊ लागले आहेत.
(madhya pradesh corona patient treatment coming jalgaon)

हेही वाचा: दिलासा मिळतोय..ॲक्टिव रुग्णांची संख्या आली १० हजारांच्या खाली

जळगाव जिल्ह्याच्या सीमेलगत मध्यप्रदेश हे मोठे राज्य आहे. रावेर, चोपडा तालुक्याचे व पर्यायाने जळगाव जिल्ह्याचेही मध्यप्रदेशातील बऱ्हाणपूर (Barhanpur) , खंडवा (Khandwa) , इंदूरसारख्या (Indore) शहरांशी भौगोलिक नजीकतेमुळे चांगले ऋणानुबंध. भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवडसह रावेर तालुक्यातून दररोज बऱ्हाणपूर, खंडव्याला ये- जा करणारे अनेक नागरिक आहेत. तीच स्थिती इंदूर, खरगोन आदी शहर- जिल्ह्यांची आहे.


जळगावचे रुग्ण मध्यप्रदेशाकडे
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावात तर हे ऋणानुबंध आणखीच दृढ होताना दिसताय. गेल्या महिन्यात जेव्हा जळगाव जिल्ह्यात रुग्णवाढीचा दर खूप जास्त होता तेव्हा जिल्ह्यातील गंभीर रुग्णांना जळगाव जिल्ह्यात बेड मिळणे कठीण झाले होते. अशा स्थितीत भुसावळ पट्ट्यातील व चोपडा तालुक्यातील काही रुग्ण जळगाव शहराकडे न येता बऱ्हाणपूर, खंडवा व इंदूरला दाखल होत होते.हेही वाचा: रोहिणी खडसेंचे चंद्रकांत पाटलांना आव्हान; तापी पुलाचा श्रेयवाद

महिनाभरात बदलली स्थिती
मात्र, एप्रिलमध्ये निर्माण झालेली जळगाव जिल्ह्यातील भीषण स्थिती काहीअंशी बदलली आहे. एकीकडे जिल्ह्यात प्रशासनाच्या सहकार्याने ए्कूणच आरोग्य यंत्रणा सक्षम करण्यावर भर दिला जात असून बेडची संख्या वाढवली आहे. दुसरीकडे रुग्णवाढीचा दर स्थिर असल्याने ॲक्टिव रुग्णसंख्या कमी होतेय. त्यामुळे बेडची उपलब्धताही बऱ्यापैकी आहे.


म.प्र.तील रुग्ण जिल्ह्यात
तिकडे मध्यप्रदेशात मात्र आता कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. जळगाव जिल्ह्यापेक्षा त्याठिकाणी आता भीषण स्थिती निर्माण होत असून त्यामुळे तेथील रुग्ण बेड उपलब्धतेमुळे जळगाव जिल्ह्याकडे येऊ लागले आहेत. बऱ्हाणपूर, खंडवा येथून दररोज १५-२० रुग्ण जळगाव जिल्ह्यात दाखल होत आहेत. डॉ. उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयासह काही खासगी रुग्णालयांमध्ये हे रुग्ण उपचार घेत आहेत. त्यामुळे अशा रुग्णांना दिलासा मिळाला आहे.

(madhya pradesh corona patient treatment coming jalgaon)

loading image