रात्रीच्या काळोखाला छेदत धावले चक्क ७४ किलोमीटर

रात्रीच्या काळोखाला छेदत धावले चक्क ७४ किलोमीटर
marathon
marathonmarathon

भुसावळ (जळगाव) : लद्दाख येथे होणार्‍या अल्ट्रा मॅरेथॉन स्पर्धेत (Ladakh marathon) सहभाग घेण्यासाठी पुण्यात प्रिक्वॉलिफाईङ रन स्पर्धा (Pre-qualifying run competition) घेण्यात आली. या स्पर्धेत भुसावळच्या डॉ. तुषार पाटील यांनी रात्रीच्या काळोखाला छेदत ७४ किलोमीटरचे अंतर व ११३८ मीटरची उंची १० तास ४९ मिनिटात पूर्ण केले. (jalgaon-bhusawal-74km-marathon-win-runner-tushar-patil)

marathon
माजी आमदार संतोष चौधरींचा पोलिसांकडून शोध; या प्रकरणी पोलिसात गुन्‍हा

लद्दाख येथे ऑगस्ट- सप्टेंबर महिन्यात दरवर्षी अल्ट्रा मॅरेथॉन आयोजित केली जाते. त्यासाठी ५५ किलोमीटर, १११ किलोमीटर, २२२ किलोमीटर, ३३३ किलोमीटर, ४४४ किलोमीटर व ५५५ किलोमीटर अशा वेगवेगळ्या गटात देश-विदेशातील सर्वोत्तम धावपटू सहभाग नोंदवत असतात. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी प्रिक्वॉलिफाईङ रन आयोजित केले जातात.

पुणे ते लवासा सिटी

अशा प्रकारचा रन पुणे येथील गोठावडे फाटा ते लवासा सिटी व तेथून पुन्हा त्याच मार्गे परत असा तब्बल ७४ किलोमीटरचा रन आयोजित केला होता. विशेष म्हणजे ११३८ मीटर उंचीचे शिखर गाठायचे होते. शनिवारी रात्री ठीक दहा वाजता भुसावळचे डॉ. तुषार पाटील, मुंबईचे सतीश गुजरण व तरुण शर्मा, पुण्याचे मंगेश शिंदे, विशाल, हरी या सहा धावपटूंनी धावायला सुरुवात केली. दुसर्‍या दिवशी रविवारी सकाळी नऊ वाजेपर्यंत सतत अकरा तास धावून ७४ किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याचे ध्येय होते. त्यामध्ये डॉ. तुषार पाटील व सतीश गुजरण यशस्वी झाले. भुसावळच्या डॉ. पाटील यांनी हे अंतर १० तास ४९ मिनिटात पूर्ण केले. डॉ. तुषार यांचे प्रवीण फालक, डॉ. निलिमा नेहेते, गणसिंग पाटील, प्रवीण पाटील, संतोष गवळे, विकास पाटील व भुसावळ स्पोर्ट्स अँड रनर्स असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी अभिनंदन केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com