६० लाख रुपये खंडणी प्रकरण; अनिल चौधरींना अंतरिम जामीन देण्यास नकार 

anil chaudhary
anil chaudhary

भुसावळ (जळगाव) : येथील महिलेची रुपये ६० लाख ७० हजार रुपये घेऊन गाळे खरेदी न देता फसवणूक केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल चौधरी यांनी औरंगाबाद खंडपीठात जमीन अर्ज केला होता. यावर आज (ता. २४) न्यायमूर्ती व्ही. व्ही. कंकणवाडी यांच्या न्यायासनासमोर झालेल्या सुनावणीत त्यांना एकतर्फी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे.
भुसावळ येथील माजी प्रभारी नगराध्यक्ष अनिल छबिलदास चौधरी यांच्यावर बाजारपेठ पोलीस स्टेशन येथे २३ जानेवारीला खंडणीचा गुन्हा दाखल झाला होता. त्यामुळे त्यांनी जिल्हा न्यायालयामध्ये अटक पूर्व जामीनसाठी अर्ज केला होता. १८ फेब्रुवारीला भुसावळ येथील जिल्हा न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे चौधरी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात पुढे धाव घेतली होती.

तेव्हापासून चौधरी गायबच
न्यायमूर्ती व्ही. व्ही. कंकणवाडी यांच्या न्यायासनासमोर आज (२४ मार्च) झालेल्या सुनावणीत त्यांना एकतर्फी अंतरिम जामीन देण्यास नकार दिला आहे. १८ फेब्रुवारी रोजी जिल्हा न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळला; तेव्हा पोलिसांना गुंगारा देत अनील चौधरी न्यायालयातून पसार होऊन आजपर्यंत पोलिसांना सापडलेले नाही. त्यामुळे आज झालेल्या सुनावणीनंतर ते स्वतः पोलिसांना शरण येणार का पोलीस त्यांना अटक करणार अथवा आता गुन्हा दाखल झाल्याच्या दोन महिन्यानंतरही ते न सापडल्यामुळे पोलिसांकडून त्यांना फरार घोषित करण्याची कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com