बेवारस वाहनांचा साडेचार लाखांत लिलाव

बेवारस वाहनांचा साडेचार लाखांत लिलाव
bhusawal police
bhusawal police

भुसावळ (जळगाव) : शहरातील आरपीडी रस्त्यावरील जुन्या पोलिस उपअधीक्षक कार्यालयाच्या आवारात बुधवारी (ता. १६) सकाळी भुसावळ विभागातून जप्त करण्यात आलेल्या ११० बेवारस वाहनांचा लिलाव करण्यात आला. याप्रसंगी चार लाख २२ हजार ५०० रुपयांची सर्वाधिक बोली लावणाऱ्या लिलावधारकास भंगार वाहनांचा ताबा कायदेशीर प्रक्रियेअंती देण्यात आला. (bhusawal-police-Auction-of-unused-vehicles)

bhusawal police
गांधीगिरी करत मुख्याधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार

बाजारपेठ, शहर, तालुका व नशिराबाद पोलिस ठाण्यातील सुमारे ११० बेवारस वाहनांसाठी बुधवारी लिलावप्रक्रिया पोलिसांनी पार पाडली. या वेळी पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, शहरचे निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, बाजारपेठचे दिलीप भागवत, तालुक्याचे रामकृष्ण कुंभार, नशिराबादचे सहाय्यक निरीक्षक गणेश चव्हाण उपस्थित होते.

मालकी हक्‍काबाबत आवाहन

शहरासह विभागात बेवारस वाहने सापडल्यानंतर ती जप्त करण्यात आली होती. शिवाय, मालकी हक्काबाबत वाहनधारकांना आवाहनही करण्यात आले. मात्र, मूळ मालक समोर न आल्याने व वर्षानुवर्षे ही वाहने पडून जीर्ण व भंगार झाल्याने त्यांची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून लिलाव करण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com