
भुसावळ रेल्वे जंक्शन हे देशातील मोठ्या जंक्शनमधील एक मानले जाते. अगदी ब्रिटीशकालिन वारसा देखील भुसावळ स्टेशनला लाभला आहे. पण याही पलिकडे जावून चंद्रशेखर आझाद हे देखील येथे आल्याचा उल्लेख असून त्यावेळची घटना म्हणजे देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्णाक्षणांनी लिहिण्यात आली आहे.
भुसावळ (जळगाव) : येथील रेल्वेस्थानकाचा ऐतिहासिक स्थानकांमध्ये समावेश करण्यात येतो. स्वतंत्र्योत्तर काळात क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांची आवडती पिस्टल (मॉवझर) व बाँब बनविण्याची साधने भुसावळ रेल्वेस्थानकावर १९२९ मध्ये पकडण्यात आली होती. त्यावेळी त्यांचा जीआरपी व ब्रिटिश पोलिसांसोबत गोळीबार झाला होता.
हेपण वाचा- सोशल मिडियावरची रेशीमगाठ; भुसावळ ते मुंबई व्हाया जम्मू- काश्मीर
चंद्रशेखर आझाद यांच्याबाबतीत घडलेली ही घटना देशाच्या स्वातंत्र्याच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिण्यात आली आहे. ही बाब लक्षात घेता रेल्वेस्थानकावर करण्यात येणाऱ्या सुशोभनांतर्गत याबाबत सजगता दाखविणारे वर्णनचित्र रेल्वेस्थानकाच्या प्रमुख दर्शनी भागावर आगामी २६ जानेवारीपर्यंत लावण्यात यावे, तसेच रेल्वेच्या अनेक घडामोडीत महत्त्वाचा भाग राहिलेले माजी खासदार स्व. हरिभाऊ जावळे यांचे नाव रेल्वेस्थानकावरील पादचारी पूल किंवा रेल्वे संग्राहालयाला देण्यात येण्याची मागणी रेल्वे सल्लागार समिती सदस्य परिक्षित बऱ्हाटे यांनी केली आहे.
क्लिक करा - जळगावातील प्रमुख आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी
वर्णनचित्र लावण्याची मागणी
रेल्वे सल्लागार समितीच्या १६५ व्या बैठकीत चर्चा करताना त्यांनी ही मागणी प्रशासनाकडे केली. ही बैठक कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. १८) दुपारी तीनला घेण्यात आली. या वेळी विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. डीआरएम विवेककुमार गुप्ता, एडीआरएम प्रबंधक मनोजकुमार सिन्हा, वरिष्ठ मंडळ वाणिज्य प्रबंधक युवराज पाटील, वरिष्ठ मंडळ परिचालन प्रबंधक आर. के. शर्मा यांच्यासह रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य हेऑनलाइनद्वारे बैठकीत उपस्थित होते.
संपादन ः राजेश सोनवणे