आईचा एकच आक्रोश..शाळा बंद असल्‍याने गेला चिमुकल्‍याचा जीव; मावशीकडे गेला असताना घडली घटना

boy dead snack bite
boy dead snack bite

पहूर (जळगाव) : कोरोना विषाणू संक्रमणामुळे शाळेला असलेल्या सुट्यांमध्ये पहूर येथील मावशीकडे पाहुणा म्हणून आलेल्या सातवीच्या विद्यार्थ्याचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास घडली. 
जळगावातील हरीविठ्ठलनगर येथील वैभव सुकलाल बारी (वय १३) हा सातवीत शिकणारा विद्यार्थी कोरोनामुळे शाळा बंद असल्‍याने पहूर पेठ येथे राहणाऱ्या उषाबाई रमेश बारी या मावशीकडे पाहुणा म्हणून आलेला होता. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास माऊशीच्या घरीच त्याला विषारी सापाने दंश केला. यानंतर त्यास तत्काळ ग्रामिण रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्यामुळे पुढील उपचारार्थ जामनेर येथील खासगी मल्टी स्पेशॅलिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. तेथे त्याच्यावर उपचार सुरू असतानाच आज सकाळी साडेनऊच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. मयत वैभवच्या पश्च्यात आई- वडील, बहीण असा परिवार आहे. सर्पदंश झाल्यानंतर अमोल बारी, योगेश बारी, अब्दुल्ला शेख, विशाल पाटील, रामेश्वर पाटील आदींनी तत्काळ दवाखान्यात नेले. डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न केले परंतु उपचारादरम्यान मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर संपली.

आईने फोडला हंबरडा
आई- वडिलांचा एकुलता एक मुलगा असलेल्या वैभवचा अकाली मृत्यू झाल्यामुळे बारी कुटूंबीयांवर मोठा आघातच झाला. त्याचा मृतदेह घेण्यासाठी वडील सुकलाल बारी नातेवाईकांसह जामनेर येथे आले होते. शवविच्छेदनानंतर वैभवचा मृतदेह हरीविठ्ठलनगर जळगाव येथे नेण्यात आला. पोटच्या मुलाचा मृतदेह पाहून आईने एकच हंबरडा फोडला.

मावस भावाला करायचा मदत
पहूर बसस्थानकावर मावस भाऊ अमोल बारी यांची नाश्त्याची गाडी होती. या गाडीवर वैभव मदत करायचा. शाळेला सुट्टी असल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून तो पहूरलाच मावशीकडे आलेला होता. गावी आई- वडील मोलमजुरी करायचे. त्यांनाही तो मदत करायचा.

संपादन ः राजेश सोनवणे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com