esakal | कुत्र्याने हल्‍ला चढवत बालकाच्या गळ्यातच घेतला चावा
sakal

बोलून बातमी शोधा

dog bite

कुत्र्याने हल्‍ला चढवत बालकाच्या गळ्यातच घेतला चावा

sakal_logo
By
टीम ई सकाळ

जळगाव : शहरातील उस्मानिया पार्क येथे अंगणात खेळत असलेल्या दीड वर्षाच्या बालकांवर पिसळलेल्‍या कुत्र्याने हल्ला (Dog bite) करत लचके तोडले. कुत्र्याच्या हल्‍ल्‍यात बालक गंभीर जखमी झाला असून त्‍यास उपचारासाठी जिल्‍हा रूग्‍णालयात (Jalgaon civil hospital) दाखल करण्यात आले आहे. (child injured dog bite and admit hospital)

उस्‍मानिया पार्क परिसरात घराच्या बाहेर अंगणात खेळत असणाऱ्या बालकावर कुत्र्याने हल्‍ला चढविला. सदर घटना सकाळी दहाच्या सुमारास घडली. नागरीकांनी वेळीच कुत्र्याच्या तावडीतून बालकाला सोडविल्‍याने बालकाला वाचविले. उस्मानिया पार्क येथे शाहरूख खान हा या घटनेत जखमी झाला आहे.

हेही वाचा: पाटाच्या पाण्यात दोन अल्पवयीन मुलांचा बुडुन मृत्यु !

बालक खेळत होता एकटा

उस्‍मानिया पार्कमध्ये शाहरूख खान व त्‍यांचा परिवार वास्‍तव्यास आहे. पेंटर काम करून ते उदरनिर्वाह करतात. त्याचा दीड वर्षाचा मुलगा इरफान शाहरूख खान राहत्या घराच्या अंगणात आज सकाळी १० वाजता एकटाच खेळत होता. अचानकपणे एका पिसाळलेल्या कुत्र्याने खेळत असलेल्या इरफानवर हल्ला केला. कुत्र्याने बालकाच्या मानेवर मोठ्याने चावा घेतला. यात बालक गंभीर जखमी झाला.

अन्‌ परिसरातील नागरीक धावून आले

बालकावर कुत्र्याने हल्ला केल्याचे पाहून आई नाजमीबी यांनी आरडाओरड केली. त्यावेळी परिसरातील नागरीकांनी धाव घेवून बालकाला कुत्र्याच्या तावडीतून सोडविले. तातडीने खासगी वाहनाने जखमी बालकाला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारर्थ दाखल करण्यात आले आहे.